IND vs WI: कर्णधार झाल्यानंतर गिलचा खेळण्याचा अंदाज बदलला, टीकाकारांना खेळीतून प्रत्युत्तर! पाहा आकडे

भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीमध्ये कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) अप्रतिम खेळी केली. त्याने नाबाद 129 धावा केल्या. इंग्लंड दौऱ्यानंतर गिलला टीम इंडियाची कर्णधारकी मिळाली. रोहित शर्माने (Rohit Sharma) क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे, निवड समितीने कर्णधारपद गिलला दिले.

गिलला कर्णधार बनवल्याबद्दल अनेकांनी टीका केली होती, कारण त्याची मागील सरासरी फार जास्त नव्हती. आता गिल आपला खेळ दाखवून सर्वांना प्रत्युत्तर देत आहे. त्याच्या कामगिरीचे आकडे पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटेल .

कर्णधार झाल्यानंतर गिलने जबाबदारीने फलंदाजी केली आहे. अनेक खेळाडू कर्णधारकीचा दबाव सहन करताना त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो, पण गिलचा उलटा अनुभव आहे. त्याच्या फलंदाजी मध्ये आधीपेक्षा खूपच सुधार झाला आहे. खेळाडू म्हणून गिलने 59 सामने खेळून 1893 धावा केल्या होत्या, त्याची सरासरी 35.1 होती आणि 5 शतकं झळकावली होती.

नेतृत्व मिळाल्यानंतर गिलने 12 सामने खेळून 933 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 84.8 आहे, जी आधीच्या तुलनेत खूप जास्त आहे. या 12 सामन्यात त्याने 5 शतकं ठोकली आहेत.

शुबमन गिल फक्त कसोटीमध्येच नव्हे, तर वनडेमध्येही रोहित शर्मा नंतर कर्णधार झाला आहे. मागील दिवसात एक आठवड्यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली. याच दरम्यान गिलला नवीन वनडे कर्णधार बनवण्यात आले आणि रोहित आता फक्त फलंदाज म्हणून खेळताना दिसेल.

Comments are closed.