असदुद्दीन ओवैसींच्या अहिल्यानगरमधील सभेबाबत पोलिसांचा मोठा निर्णय, 12 अटींचं बंधन, MIM च्या सभे
असदुद्दीन ओवैसी: AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची आज अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar News) सभा होणार असून, काल शहरात झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या सभेकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहिले आहे. या सभेसाठी पोलिसांकडून (Police) परवानगी मिळाली नव्हती. मात्र आता पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून कडक अटी व शर्तींसह सभेला परवानगी देण्यात आली आहे.
मुकुंदनगर भागात सुरू आहे सभेची तयारी (Asaduddin Owaisi rally in Ahilyanagar)
असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेचे आयोजन शहरातील मुकुंदनगर भागात करण्यात आले आहे. AIMIM पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सभेची तयारी युद्धपातळीवर करत असून, “सभा होणारच,” असा दावा पक्षाकडून करण्यात येत होता. दरम्यान, पोलीस विभागाकडून सभेला परवानगी देण्यात आलेली नव्हती.
कालच्या घटनेनंतर शहरात तणाव (आसाडुद्दीन ओवैसी रॅली अहिलीनगरमध्ये)
सोमवारी (दि. 29) अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये रांगोळीवरून निर्माण झालेला वाद, धक्काबुक्कीची तक्रार, दंगलीसदृश्य परिस्थिती, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात 39 जणांची नावे असून अज्ञात आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणी CCTV फुटेज आणि व्हिडीओ क्लिप्सच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
अटी व शर्तींसह सभेला परवानगी (आसाडुद्दीन ओवैसी रॅली अहिलीनगरमध्ये)
अहिल्यानगरमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांच्या सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र आता पोलीस प्रशासनाने ओवैसी यांच्या सभेस परवानगी दिली आहे. मात्र, काही कडक अटी व शर्ती लावण्यात आल्या आहेत. त्यात सभेसाठी नागरिक कोणत्या मार्गाने येणार, याचे नियोजन करणे बंधनकारक आहे. सभेनंतर परतण्यासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करणे. ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे. सभास्थळी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, अशा अति शर्थी घालण्यात आल्या आहेत.
असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेसाठी घालून दिलेल्या अटी
1) जाहिर सभा घेण्याकरीता आवश्यक लागणा-या परवानगी स्थानिक स्वाराज्य संस्था यांचेकडुन घेवुनच सभा घ्यावी. स्टेज, मंडप उभारणी, एम एस ई बी, पाकींग व्यवस्था, आरोग्य विभाग, अग्निशमक विभाग इत्यादी]त्याबाबचे मंजुरी पत्र सादर करावे.
2) जाहिर सभा घेत असताना फायर ब्रिगेड, अॅम्ब्युलन्स, अती महत्वाचे वाहने, अत्यावश्यक वस्तु वाहतुक करणारे वाहने येण्या जाणेसाठी अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन पार्किंग व्यवस्था करावी. सदर पार्किंग ठिकाणी आपले स्वयंसेवक नेमावेत. वाहतुक पोलीसांच्या सुचनांचे पालन करावे.
3) आपले पक्षाचे खासदार बें अससुददीन ओवेसी यांना झेड वर्गवारीची सुरक्षा आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी ४५ बाय ६० फुट लांबी रुंदीचे डी झोन तयार करुन स्टेजची व्यवस्था करावी. तसेच स्टेजवर बसणा-या प्रमुखांची नावांची यादी आगाऊ उपलब्ध करुन देवुन त्यांचे पास आमचेकडुन घ्यावेत. स्टेज सुरक्षामध्ये कोणताही निष्काळी पणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
4) सभेच्या ठिकाणी सुरक्षाच्या अनुषंगाने सभेचे ठिकाण चारही बाजुने सुरक्षीत करुन समक्ष दिलेल्या सुचनेप्रमाणे स्वतंत्र प्रवेश व्दाराची व्यवस्था करावी जेणेकरुन सुरक्षा अनुषंगाने सोयीचे होईल याबाबत काटेकोरपणे पालन करावे.
5) जाहिर सभेच्या अनुषंगाने लावण्यात येणारे झेंडे, पोस्टर्स व बॅनर्स याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वतंत्र पारवानगी घेवुन सादर करावी.
6) आपण लावण्यात आलेल्या झेंडे व पोस्टर्स व बॅनर्स व इतर जाहिरातीमुळे कोणत्याही धर्माच्या/जातीच्या भावना दुखवतील असे वक्तव्य अथवा देखावे अथवा विभिस्त किंवा मना दुखवतील असे गाणी पोस्टर्स लावू नयेत.
7) जाहिर सभा अयोजित करताना असताना कोणावरही आपले कार्यकर्ते जबरदस्तीने सहभागी करणार नाही याची दक्षता घ्यावी. जाहिर सभा ही शांततेने व सुरळीत पार पाडणेसाठी पोलीस ज्या ज्या वेळी मिटिंगसाठी बोलविले जाईल त्यावेळेस हजर राहुन त्यावेळी देणेत आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.
8) जाहिर सभा मध्ये महिला व मुली सहभागी असतील तर त्यांची गैर सोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. शक्यतो महिला व पुरुष असे दोन वेगवेगळे भाग करावेत.
9) जाहिर सभा असताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेचा/मार्गाचा वापर करावा. जाहिर सभा घेण्यापुर्वी अथवा नंतर कोणतीही रॅली काढता येणार नाही. सभेकरीता येणारे वक्ते यांना झेड सुरक्षा असलेने त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कोठेही पोलीसांच्या परवानगी शिवाय दौ-यात बदल करता येणार नाही.
10) जाहिर सभा च्या वेळी अत्यावश्यक सेवा चालु राहितील तसेच आपले समर्थकाकडुन त्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
11]जाहिर सभेच्या दरम्यान अथवा नंतर आपले कार्येकर्ते यांचेकडुन कोणत्याही शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
12]सभेच्या ठिकाणी लाईट, स्वच्छता,पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंग याची सभेला येणा-या नागरिकांचे प्रमाणात पुरेशी सोय करण्यात यावी.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा (आसाडुद्दीन ओवैसी रॅली अहिलीनगरमध्ये)
ही सभा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली आहे. काल ओवैसी यांनी कोल्हापूरमध्ये सभा घेतल्यानंतर आता अहिल्यानगरमध्ये त्यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या सभेतून ओवैसी काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर सभेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कालच्या तणावपूर्ण घटनेनंतर शहरात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर ही सभा शांततेत पार पाडणं हे प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरणार आहे.
अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं होतं?
धार्मिक कार्यक्रमादरम्यान रस्त्यावर रांगोळी रेखाटल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कोठला परिसरात आंदोलन करण्यात आले. शांततेत सुरू असलेले हे आंदोलन अचानकच हिंसक वळण घेऊन जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत काही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, सात पोलीस कर्मचारी आणि एक महिला होमगार्ड जखमी झाले आहेत. जमावाला त्वरित पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 39 जणांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये काही अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 150 ते 200 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून संशयितांची धरपकड सुरू होती. दरम्यान, शहरात तणावपूर्ण शांतता आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.