असं वाटतंय जणू काळच थांबला..; आशाताईंच्या जाण्याने क्रिकेटचा देव गहिवरला, सचिनपासून ते युवीपर्य
आशा भोसले यांच्या निधनाबद्दल क्रिकेटपटूंची भावनिक प्रतिक्रिया : भारतीय संगीत क्षेत्रातील एक महान पर्व आज संपले आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीपासून क्रीडाक्षेत्रापर्यंत सर्वच स्तरांतून दुःख व्यक्त केले जात आहे. आशाताईंच्या आवाजाचे वेड जगभरातील कोट्यवधी चाहत्यांप्रमाणेच दिग्गज क्रिकेटपटूंनाही होते. त्यांच्या जाण्याने एक पर्व संपल्याची भावना व्यक्त करत सचिन तेंडुलकरपासून ते युवराज सिंगपर्यंत अनेक दिग्गजांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
काय म्हणाला सचिन तेंडुलकर? (आशा भोसलेवर सचिन तेंडुलकर)
सचिन तेंदुलकर यांने लिहिले की, आजचा दिवस भारतासाठी, आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी अत्यंत दुःखद आहे. आमच्यासाठी आशा ताई म्हणजे कुटुंबच होत्या. आज या दुःखाचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. एका क्षणात हृदय निःशब्द होतं, आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी दिलेल्या असंख्य सुरांमध्ये ते हरवून जातं. असं वाटतंय जणू काळच थांबून गेला आहे. पण त्यांच्या अजरामर गाण्यांमधून त्या सदैव आपल्या सोबत राहतील. धन्यवाद ताई, आमचं आयुष्य उबदारपणा, सौंदर्य आणि अविस्मरणीय संगीताने भरून टाकल्याबद्दल. तुमची उणीव शब्दांत व्यक्त करता येणार नाही, आशा ताई.
भारतासाठी आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी अत्यंत दुःखद दिवस.
आमच्यासाठी आशा ताई कुटुंबच होत्या. आज, आपल्याला वाटत असलेल्या नुकसानासाठी शब्द खूप लहान वाटतात. एका क्षणी हृदय शांत होते आणि दुसऱ्याच क्षणी, तिने आपल्या सर्वांना भेटवलेल्या अगणित सुरांमधून ते वाहून जाते.
असे वाटते…
— सचिन तेंडुलकर (@sachin_rt) 12 एप्रिल 2026
क्रीडाविश्वाकडून भावपूर्ण श्रद्धांजली
2007 च्या टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील हिरो युवराज सिंग याने सोशल मीडियावर भावना व्यक्त करत म्हटले की, “आशा भोसले यांच्या गाण्यांवरच मी लहानाचा मोठा झालो. आज असं वाटतंय की बालपणाचा एक भागच शांत झाला आहे.” त्यांनी आशाताईंच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली.
आशाजींना ऐकतच मोठी झालो… मूडला काही फरक पडत नाही, त्यांचे नेहमीच एक गाणे होते जे ते अगदी तंतोतंत बसते. कितीतरी आठवणी, कितीतरी भावना त्या आवाजाशी जोडल्या गेल्या. आपल्या वाढीचा एक भाग आज शांत झाल्यासारखे वाटते.
आशा जी शांत राहा 🙏 माझ्या मनापासून शोक.… pic.twitter.com/tHFJeHrotF
— युवराज सिंग (@YUVSTRONG12) 12 एप्रिल 2026
दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने श्रद्धांजली वाहताना म्हटले की, आशा भोसले यांच्या मधुर आवाजाने अनेक पिढ्यांची मनं जिंकली. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांची परंपरा सदैव लोकांच्या हृदयात जिवंत राहील.
आशा भोसले यांच्याबद्दलच्या अशा बातम्या ऐकून त्यांच्या आवाजाने पिढ्यांना किती खोलवर स्पर्श केला आहे याची आठवण होते. एक खरा आख्यायिका ज्याचे संगीत वेळ आणि भावनांच्या पलीकडे आहे. तिचा वारसा कायम आपल्या हृदयात जिवंत राहील. प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. #आशाभोसले #दंतकथा #रिपाशतायी pic.twitter.com/1r4OdrBCNx
— हरभजन टर्बनेटर (@harbhajan_singh) 12 एप्रिल 2026
युसूफ पठाण यांनीही शोक व्यक्त केला. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी म्हटले की, “मन्ना डे, लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या पिढीचा शेवटचा दुवा आपण आज गमावला.” तर माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी सांगितले की, आशाताईंचा सुरेल आवाज सदैव अमर राहील.
एक कालातीत आवाज, एक महान वारसा. आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. तिचा आवाज कायम जिवंत राहील.
— युसूफ पठाण (@iamyusufpathan) 12 एप्रिल 2026
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही दुःख व्यक्त करत म्हटले की, भारतीय संगीत क्षेत्रातील ही अमूल्य धरोहर गमावल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या मधुर आवाजाची आठवण सदैव जिवंत राहील. तसेच त्यांनी आशाताईंच्या कुटुंबाला या कठीण काळात धैर्य मिळो, अशी प्रार्थना केली.
भारतीय संगीत जगताचा अनमोल वारसा असलेल्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांचा गोड आवाज आणि अजरामर गाणी आपल्या हृदयात सदैव जिवंत राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि या कठीण प्रसंगी शोकाकुल परिवाराला शक्ती देवो. विनम्र श्रद्धांजली. pic.twitter.com/xWrPuE2KL4
— राजीव शुक्ला (@शुक्लाराजीव) 12 एप्रिल 2026
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
दिग्गज आशा भोसले यांच्या निधनाने दु:ख झाले. तिची लालित्य आणि अतुलनीय प्रतिभा नेहमीच आपल्या आठवणींमध्ये राहील! pic.twitter.com/5jK25lRkIE
— गौतम गंभीर (@GautamGambhir) 12 एप्रिल 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.