स्वरांवर राज्य करणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचा अनेक पुरस्कारांनी झाला होता गौरव
स्वरांवर राज्य करणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. सुमारे आठ दशके त्यांनी सुरेल आवाजाने जगाला भूरळ घातली होती. त्यांच्या संगीत क्षेत्रातील या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार
आशा भोसले यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण, २००० मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि दोनदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना १९८१ आणि १९८६ मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला होता. त्यांना सात वेळा फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. १९९६ मध्ये, त्यांना ‘रंगीला’ चित्रपटासाठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला होता. २००१ मध्ये, त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि २००२ मध्ये, ‘लगान’ चित्रपटासाठी आयफा पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरिक्त, त्यांना १९८७ मध्ये ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ पुरस्कार, २००० मध्ये ‘सिंगर ऑफ द मिलेनियम’ (दुबई) आणि २००२ मध्ये ‘बीबीसी जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला.
आशा भोसले यांच्या संगीतातील कराकिर्दीत त्या अतुच्च शिखरावर पोहचल्या होत्या. मात्र, त्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होत्या. त्यांचे पहिले लग्न गणपतराव भोसले यांच्याशी झाले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही. या लग्नादरम्यान त्यांना मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी आर. डी. बर्मन यांच्याशी लग्न केले. आशा भोसले यांना तीन मुले आहेत.
8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रात जन्मलेल्या आशा भोसले या लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहिण आहेत. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे अभिनेते व गायक होते. तर आई शिवार्ताई मंगेशकर गृहिणी होत्या. आशा भोसले यांनी दोन विवाह केले होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्यांची मुलगी वर्षा हिने आत्महत्या केली होती तर मुलगा हेमंत भोसले यांचं कर्करोगामुळे निधन झालं. त्यांचा दुसरा मुलगा आनंद भोसले आहे. त्यांची नात जनाई भोसले ही देखील गायिका आहे.
आशा भोसले यांनी 1943 मध्ये मराठी गाण्यांपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदीसह विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली. त्यांच्या गाण्यांनी अनेक दशकं संगीतप्रेमींवर अधिराज्य गाजवलं आहे. दरम्यान, आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Comments are closed.