आशिष चंचलानी घेऊन येतोय हास्य आणि भयाचा अनोखा तडका, ‘एकाकी’चा ट्रेलर लाॅंच होताच सोशल मीडियावर व्हायरल

आशिष चंचलानी हा खऱ्या अर्थाने हिंदुस्थानातील डिजिटल स्टार आहे. त्याने कायमच त्याच्या यू ट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आशिष आता एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. त्याने आता दिग्दर्शनात पदार्पण केले असून, त्याचा “एकाकी” वेबसीरीज लवकरच यू ट्यूबवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरीजची घोषणा झाल्यापासून, हा चित्रपट चर्चेत आहे. या वेबसीरीजचे पोस्टर आणि फर्स्ट लूकनंतर ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.

आशिष चंचलानीच्या “एकाकी” वेबसीरीजचा ट्रेलर सध्या सोशल माध्यमांवर वाहवा मिळवत आहे. “एकाकी” चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आशिषने त्याच्या “एकाकी” चित्रपटासाठी अनेक प्रमुख डिजिटल स्टार्सना एकत्र आणले आहे. आशिषसोबत, या चित्रपटात आकाश दोडेजा, हर्ष राणे, सिद्धांत सरफरे, रोहित साधवानी, ग्रिशिम नवानी आणि शशांक शेखर यांच्याही भूमिका आहेत.

आशिष चंचलानी या वेबसीरीजच्या माध्यमातून हॉरर-कॉमेडीच्या जगात प्रवेश करत आहे. हा शो २७ नोव्हेंबर रोजी YouTube वर मोफत प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.