विलेपार्ले मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबईचे माजी महापौर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू-विलेपार्लेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमेश प्रभू आणि त्यांची पत्नी, प्रख्यात वैद्यकीय चिकित्सक डॉ. पुष्पा प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रभू महिमा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विलेपार्ले येथे पार पडला.
या वेळी डॉ. प्रभू यांचे कार्य आजच्या पिढीला समजावे म्हणून हे पुस्तक राज्यातील प्रत्येक लायब्ररीत ठेवण्यासाठी आणि त्यांचे नाव विलेपार्ले येथील मेट्रो स्टेशनला देण्याचा आग्रह पार्लेकरांच्या वतीने करण्यात आला. त्यावर डॉ. रमेश प्रभू यांचे नाव विलेपार्ले मेट्रो स्टेशनला देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशीष शेलार यांनी दिले. या सोहळ्याला आमदार ऍड. पराग अळवणी, माजी महापौर ऍड. निर्मला सामंत-प्रभावळकर, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे विश्वस्त राजू रावळ, डॉ. प्रभू यांचा मुलगा अरविंद प्रभू, मुलगी लीना प्रभू यांच्यासह पार्लेकर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.