अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही, हेमंत पाटलांची जोरदार टीका, महापालिका निवडणुकांवरून धूसफूस,म्हणाल
नांडेड: राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीसाठी जिल्ह्या -जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे .अनेकांनी महापालिकेत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे,तर अनेक जण तशा तयारीत आहेत. दरम्यान, नांदेडमध्ये राजकारणाला वेग आलाय .आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप स्वबळावर निवडणुकीत लढवण्याचे संकेत भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिल्यानंतर त्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे . अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही .अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन आहेत .त्यांना युतीधर्माची खूप कमी माहिती आहे .आम्ही भाजपच्या जुन्या मंडळींसोबत हातात हात घालून काम केलं असल्याचं सांगत हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला .
काही दिवसांपूर्वीच हेमंत पाटील यांनी अशोकाचे झाड हे दिसायला उंच आणि हिरवेगार असते पण बारा वाजता त्याची सावली केवळ स्वतःलाच मिळते,इतरांना मात्र नसावली न फळ..असं म्हणत नाव न घेता बोचरी टीका केली होती .आता अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही .त्यांना युती धर्माची फार माहिती नाही असं ते म्हणालेत .हेमंत पाटील यांचा वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा महायुतीतच चढाओढ सुरू असल्याचे बोलले जात आहे .
काय म्हणाले हेमंत पाटील ?
आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याचे संकेत अशोक चव्हाण यांनी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही असं म्हणत जोरदार टीका केली आहे .ते म्हणाले ,त्यांचे स्वबळ असेल तर आमचे पण आहेच. प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवायचा असतो.तसेच अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही .अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन आहेत .त्यांना युतीधर्माची माहिती खूप कमी आहे .युती धर्म म्हणून आम्ही भाजपसोबत काम केले आहे .भाजपच्या जुन्या मंडळींसोबत हातात हात घालून काम आम्ही केल्याचे हेमंत पाटील म्हणाले .
नांदेड जिल्ह्यात पक्षीय बलाबल कसे ?
नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत . यामध्ये किनवट, भोकर ,नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर ,नायगाव, हदगाव, लोहा, देगलूर, मुखेड या मतदारसंघांचा समावेश होतो .नांदेड जिल्ह्यातील बहुतेक मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगला होता .लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता .विधानसभेत मात्र सर्वच जागांवर महायुतीने वर्चस्व मिळवलं .नांदेड विधानसभेच्या नऊ जागांपैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला नाही .
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.