12 दिवसांनी खदानीत कार सापडली, कारमध्ये मृतदेह, शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरणाचा थरार A टू
अशोक धोदी प्रकरण: शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात मोठी माहिती समोर आलीये. अशोक धोडी यांची लाल कलरची ब्रेजा कार गुजरातमधील रिग्राम मालाफलिया येथे एका बंद दगड खाणीत सापडली आहे. या कारमध्येच अशोक धोडी यांचा मृतदेह देखील सापडलाय. धोडी यांच्या कारबाबत माहिती मिळाल्यानंतर पालघर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. अशोक धोडी यांचं काही दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं. त्यामुळे त्यांचा घात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशोक धोडी यांचं 12 दिवसांपूर्वी अपहरण, आत्तापर्यंत काय काय घडलं?
शिवसेना शिंदे गटाचे डहाणू तालुका विधानसभा संघटक अशोक धोडी गेल्या 12 दिवसापासून बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचं अपहरण झाल्याचे समोर आले होते. मीरा रोड येथे गेलेल्या धोडी यांचं घरी येताना अपहरण करण्यात आलं होतं. याप्रकरणी पालघर पोलिसांनी चार संशयतांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी हा पोलीस चौकीतून फरार झाला होता. अपहरण प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आले होते मात्र, अजूनही पाच जण फरार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. अटक असलेल्या चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, बारा दिवसांनी बेपत्ता असलेले डहाणू शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरणाचा सुगावा पोलिसांना लागला. त्यांची गाडी पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली होती. लवकरच याचा छडा लागेल. तसेच या प्रकरणावर माझं बारीक लक्ष आहे, जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मत पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलं होतं.
मीरा रोड येथे गेलेल्या धोडी यांचं घरी येताना अशोक धोडीचं अपहरण
अशोक धोडी यांचा अपहरण पूर्वीचा आणखी एक सीसीटीव्हीचा व्हिडिओही समोर आला होता. मीरा रोड येथून घराकडे निघताना अशोक धोडी यांचा इमारतीतून निघतानाचा सीसीटिव्ही समोर आला होता. 20 जानेवारीचा मीरा रोड साई बाबा नगर , श्रीनगर अपार्टमेंट येथील दुपारी एक वाजताच्या सुमारास सीसीटिव्ही समोर अशोक धोडी आले होतं. घरगुती कामासाठी मीरा रोड येथे गेलेल्या धोडी यांचं घरी येताना अपहरण करण्यात आलं होतंय.
आत्तापर्यंत किती जणांना अटक?
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणात अजूनही तिघेजण फरार आहेत. यापैकी दोघांनी राजस्थान गाठलं असून त्यांच्या तपासासाठी एक पथक रवाना झालं आहे, तर अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी रात्री पोलीस चौकीतून फरार झाला होता. पोलिसांची आठ पथक वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=h_sb7qzf_q
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.