Ashok Harnaval accused Neelam Gorhe of blackmailing officials by bringing attention to the legislature


नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून चांगलाच वाद पेटला आहे. याप्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाचे पुण्याचे माजी नगरसेवक आणि महापालिकेतील गटनेते अशोक हरणावळ यांनी नीलम गोऱ्हे यांच्याबाबत खळबळजनक आरोप केला आहे.

पुणे : नवी दिल्लीमध्ये नुकतेच मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून चांगलाच वाद पेटला आहे. कुठे तरी दोन मर्सिडीज मिळाल्या की पदे मिळतात, असे विधान त्यांनी केले. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी  नीलम गोऱ्हेंचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. तसेच ठाकरेंची शिवसेनाही नीलम गोऱ्हेंविरोधात आक्रमक झाली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पुण्याचे माजी नगरसेवक आणि महापालिकेतील गटनेते अशोक हरणावळ यांनी नीलम गोऱ्हे यांच्याबाबत खळबळजनक आरोप केला आहे. (Ashok Harnaval accused Neelam Gorhe of blackmailing officials by bringing attention to the legislature)

नीलम गोऱ्हे यांच्या विधानावरून वाद पेटला असतानाच संजय राऊत यांनी म्हटले होते की, अशोक हरणावळ यांची मुलाखत घ्या, त्यानंतर नीलम गोऱ्हे यांचे मर्सिडीज प्रकरण काय आहे ते कळेल. यानंतर आता अशोक हरणावळ यांनीही नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, नीलम गोऱ्हे पक्षाच्या संपर्क प्रमुख असताना त्यांनी पुण्याच्या विकास आराखड्याला आधी पाठिंबा द्यायला लावला आणि नंतर विरोध केला. विकास आराखड्यातील अनेक जागांची आरक्षणे उठवण्यासाठी त्यांनी हे केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Shiv Sena UBT : मर्सिडिजप्रकरण नीलम गोऱ्हेंना भोवले, सुषमा अंधारेंकडून अब्रूनुकसानीचा दावा

अशोक हरणावळ म्हणाले की, नीलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करायच्या. एवढेच नाही तर नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कार्यक्रम पत्रिका बघायच्या. त्यातील आर्थिक उलाढालींची माहिती त्यांना हवी असायची. त्यामुळे नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर बोलू नये, अन्यथा त्यांची कुंडली बाहेर काढली जाईल, असा इशारा अशोक हरणावळ यांनी दिला आहे.

नीलम गोऱ्हेंकडून सारवासारव

दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. या संमेलनाच्या “असे घडलो आम्ही” या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्याकी, ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदेंना देण्यात आले होते, अशी माहिती नीलम गोऱ्हेंनी दिली. गोऱ्हेंनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी काही तासांमध्येच उद्धव ठाकरेंवर आरोप केलेल्या आरोपाबाबत सारवासारव केली.

हेही वाचा – मराठी : ‘एक महिला काय बोलली तुटून पडलाय? आम्ही जास्त खोलात गेलो, तर…’ शिंदेंच्या मंत्र्याचा ठाकरेंना सेनेला इशारा



Source link

Comments are closed.