Ashok Kharat News – रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करणार; करुणा मुंडेंचा इशारा
नाशिकमधील वादग्रस्त अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरात याच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे चाकणकर यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आता करुणा मुंडे यांनी केली आहे. सरकारने चाकणकर यांचा राजीनामा घेतला नाही, तर थेट मंत्रालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.
बीड येथे पत्रकारांशी संवाद साधताना करुणा मुंडे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर घणाघाती आरोप केले. ज्या व्यक्तीवर बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत, अशा व्यक्तीसोबत महिला आयोगाच्या अध्यक्षांचे फोटो दिसणे आणि त्याच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे पदाला न शोभणारे आहे.
खरात याच्या संस्थेत चाकणकर संचालिका असल्याचा खळबळजनक दावाही मुंडे यांनी यावेळी केला. “रुपाली चाकणकर या पदावर असेपर्यंत राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळणे अशक्य आहे,” अशी टीका त्यांनी केली.
Comments are closed.