ईशानेश्वर मंदिर, कार्यालय ते फार्महाऊस… अशोक खरातच्या मालमत्तांची ED कडून झाडाझडती, आज पुन्हा
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आणि भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्याभोवती आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) आपला फास आवळला आहे. एसआयटीच्या (SIT) कारवाईनंतर आता ईडीने या प्रकरणात उडी घेतली असून, खरातच्या विविध मालमत्तांची तपासणी सुरू केली आहे. दुसरीकडे, पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या बेकायदेशीर संपत्तीचा शोध घेण्यासाठी ईडीच्या पथकाने एसआयटी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये ईशानेश्वर मंदिर, खरातचे कार्यालय, फार्म हाऊससह विविध ठिकाणच्या जमिनीच्या भूखंडांची पाहणी करण्यात आली.
Ashok Kharat Case Nashik Crime News: प्रॉपर्टीची मोजणी आणि सध्याच्या बाजारमूल्याचा तपास
तपास यंत्रणांकडून सध्या या मालमत्तांची मोजणी सुरू असून, त्यांचे सध्याचे बाजारमूल्य किती आहे, याचा अंदाज घेतला जात आहे. विशेष म्हणजे, खरातने एवढी मोठी मालमत्ता कोणत्या उद्देशाने जमा केली आणि काही विशिष्ट मालमत्तांमध्ये ‘पार्टनर्स’ का घेतले? याचा सखोल तपास ईडी करत आहे. या व्यवहारांमध्ये मनी लाँड्रिंग झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरातची बँक खाती आधीच सील करण्यात आली असून, त्यातील संशयास्पद व्यवहारांचे विश्लेषण सध्या सुरू आहे.
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : आज पुन्हा न्यालसंमोर हजेरी
अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात सुनावण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने (Video Conferencing) पार पडण्याची शक्यता आहे.
Ashok Kharat Case Nashik Crime News: चौथ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीच्या मागणीची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटी आतापर्यंत झालेल्या तपासाचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. खरातवर दाखल असलेल्या चौथ्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला पुन्हा पोलीस कोठडी मिळावी, यासाठी तपास यंत्रणा न्यायालयाकडे विनंती करण्याची दाट शक्यता आहे. खरातने धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून किती कोटींची माया जमवली, याचे धागेदोरे आता हळूहळू समोर येत आहेत. ईडीच्या एन्ट्रीमुळे या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले असून, अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणले आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.