औषधाची बाटली, विविध खडे जप्त, पीडित महिलांचे लाईव्ह स्क्रिनिंग; अशोक खरातच्या केबिनमध्ये SIT ने
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : अशोक खरात (Ashok Kharat) याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात आज पुन्हा एकदा एसआयटी आणि फॉरेन्सिक टीम पोहोचली. पीडित महिलांना घेऊन एसआयटीची टीम अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात दाखल झाली. अशोक खरातने याच कार्यालयात 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केले होते. अशोक खरातने पीडित महिलांचे कुठे लैंगिक शोषण केले, याबाबतची माहिती देखील एसआयटीकडून जाणून घेण्यात आली. अशोक खरातच्या कार्यालयातील आजचा एसआयटीचा तपास पूर्ण झाला आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरातच्या कार्यालयात आज काय काय घडलं? (Ashok Kharat Case Nashik Crime News)
फिर्यादीला घेऊन एसआयटीचे घटनास्थळी दाखल पथक झाले होते. ओकस प्रॉपर्टी कार्यालयात आज एसआयटीकडून झाडाझडती घेण्यात आली. यावेळी अशोक खरातच्या ऑफिसमधून एसआयटीने आज महत्वाचे पुरावे गोळा केले. यामध्ये औषधाची बाटली, विविध प्रकारच्या आकारांचे खडे आणि इतर वस्तू आढळून आल्या. या सर्व वस्तू एसआयटीने जप्त केल्या आहेत. पीडित महिलांना घेऊन एसआटी आली तेव्हा घटनाक्रम जाणून घेत मोबाईलमध्ये लाईव्ह स्क्रीनिंग केले. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसह एसआयटीने डिजिटल पंचनामा केला. अशोक खरातच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत अशोक खरातवर 8 लैंगिक शोषणाचे तर दोन आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर- (Ashok Kharat Case)
अशोक खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर येत आहेत. अशोक खरातच्या मोबाइलमध्ये अडीच हजारांहून अधिक नंबर कोडवर्डमध्ये सेव्ह असल्याने या प्रकरणाचा तपास अधिक गूढ बनला आहे. अशोक खरातचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. मोबाईलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावे ‘डमी’ स्वरूपात सेव्ह करण्यात आल्याचा संशय आहे. तर अशोक खरातने पीडित महिलांचे नंबरही सेव्ह केलेले नाहीय. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तो वेगळ्या मोबाइलचा वापर करत होता, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरातचा लॅपटॉप, मोबाईलसह विविध कागदपत्रेही ताब्यात- (Ashok Kharat Case)
अशोक खरातच्या शिवानिका संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) मालमत्तेची माहिती मागवली असून अशोक खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरु आहे. अशोक खरात प्रकरणी तपासात विविध माहिती समोर येत आहे. अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीत आणखी एक धक्कादायक पोलिसांच्या हाती लागली आहे. अशोक खरातचा लॅपटॉप, मोबाईलसह विविध कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अशोक खरातच्या या मोबाइलमधून अनेक धागेदोरे समोर येत आहेत. अशोक खरातच्या मोबाइलमध्ये अडीच हजारांहून अधिक नंबर कोडवर्डमध्ये सेव्ह असल्याने या प्रकरणाचा तपास अधिक गूढ बनला आहे.
अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी- (Ashok kharat Case)
स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 1 एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणात पोलीस तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला समोर येत असल्याने, या वाढीव कोठडीत अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.