अशोक आणि निवेदिता सराफ यांची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या सुपरहिट जोडीची केमिस्ट्री आजवर सर्वांनी मोठ्या पडद्यावर अनुभवली आहे. आता ही आवडती जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र येत आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून अशोक सराफ आणि निवेदिता सराफ छोट्या पडद्यावर एकत्र येणार आहेत. या मालिकेत निवेदिता सराफ या उत्साही, आत्मनिर्भर आणि अविवाहित स्त्रीची भूमिका साकारत आहेत.

Comments are closed.