IND vs ENG: बेन स्टोक्सच्या दुटप्पी वागणुकीवर आर अश्विनचा संताप, जाणून घ्या काय म्हणाला?

मॅन्चेस्टर कसोटी सामन्याच्या शेवटी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stocks) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांना लवकर ड्रॉ स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र या दोन्ही भारतीय खेळाडूंनी तो स्पष्टपणे नाकारला. त्यानंतर स्टोक्स आणि त्यांची टीम खूपच चिडलेली दिसली. हे पाहून संपूर्ण क्रिकेटविश्व इंग्लिश संघावर टीका करत आहे. आता या यादीत भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनचाही (R Ashwin) समावेश झाला आहे. स्टोक्सच्या दुटप्पी वागणुकीवर अश्विन चांगलाच भडकला आहे.

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांनी प्रस्ताव नाकारल्यावर इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स खूप त्रस्त दिसत होता. यावर भाष्य करताना अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले, तुम्ही कधी ‘दुहेरी मापदंड’ (Double Standards) हा शब्द ऐकला आहे का? त्यांनी म्हणजेच भारतीय गोलंदाजांनी दिवसभर तुमच्या गोलंदाजांचा सामना केला, तुम्हाला फलंदाजी करायला भाग पाडलं आणि जेव्हा आमचे फलंदाज शतकाच्या जवळ पोहोचले, तेव्हा तुम्ही सामना सोडून निघून जायचं ठरवलं? त्यांनी असं का करावं?

स्टोक्सच्या या वागण्यावर टीका करत अश्विन पुढे म्हटला,
तुम्ही विचारता, ‘तुम्ही हॅरीविरुद्ध शतक करणार का?’ अरे ब्रूक नाही का? त्याला शतक करायचंच होतं! कोणताही गोलंदाज आणा, आम्हाला काही हरकत नव्हती. ब्रूकला बोलावणं हा तुमचा निर्णय होता, आमचा नव्हे. यामागे दोन कारणं होती, एक, तुम्हाला तुमचे गोलंदाज थकवायचे नव्हते. ठीक आहे. दुसरं कारण म्हणजे, तुम्ही निराश झाला होता आणि तुम्ही विचार केला की, जर मी आनंदी नाही, तर तुम्हीही का असावा?’ पण क्रिकेट असं चालत नाही. हे कसोटी सामने आहेत. शतक कमावावं लागतं, कोणीतरी गिफ्ट देत नाही. वॉशिंग्टनला ते मिळवण्याचा पूर्ण अधिकार होता. जडेजालाही तो अधिकार होता.

Comments are closed.