आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाचा नवा चेहरा! 2023 मधील 8 खेळाडू बाहेर, तर 3 दिग्गजांनी घेतली निवृत्ती
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया कप 2025 साठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादव संघाचा कर्णधार असला, तरी बऱ्याच काळानंतर पुनरागमन करणाऱ्या शुबमन गिलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. गिलने जानेवारी 2024मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. गिल हा भारताचा बहु-फॉर्मेट खेळाडू आहे, म्हणून तो भारताच्या शेवटच्या आशिया कप संघाचाही भाग होता. आशिया कपचा शेवटचा हंगाम 2023मध्ये एकदिवसीय स्वरूपात खेळवण्यात आला होता, जिथे भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला 10 गडी राखून पराभूत करून विक्रमी 8व्यांदा विजेतेपद जिंकले होते. आशिया कपच्या बदलत्या स्वरूपामुळे आणि खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारताच्या संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. आशिया कप 2023 आणि आशिया कप 2025साठी भारतीय संघावर एक नजर टाकूया-
आशिया कप 2023 भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा
आशिया कप 2023 साठी बीसीसीआयने 17 खेळाडूंचा संघ निवडला होता. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा होता, तर संघात विराट कोहली आणि रवींद्र जडेजा सारखे वरिष्ठ खेळाडू देखील होते. यावेळी आशिया कप 2025 मध्ये स्वरूप बदलले आहे, त्यामुळे या स्वरूपातून निवृत्ती घेतल्याने हे तिघे संघात नाहीत. वगळण्यात आलेल्या इतर 8 नावांबद्दल जाणून घेऊया-
2023च्या आशिया कप संघात समाविष्ट करण्यात आलेल्या केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णा या खेळाडूंना यावेळी संधी मिळालेली नाही. काही खेळाडू आता टी20 सेटअपमध्ये बसत नाहीत, तर काहींना त्यांच्या फिटनेस आणि कामगिरीच्या आधारे वगळण्यात आले आहे.
तथापि, वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिध कृष्णा अशी दोन नावे आहेत ज्यांना आशिया कप 2025 च्या राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे.
आशिया कप 2025 साठी भारतीय संघ
आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रिंकू सिंग
स्टँडबाय खेळाडू: यशस्वी जयस्वाल, प्रसीद कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि ध्रुव जुरेल
आशिया कप 2023 च्या तुलनेत आशिया चषक 2025 मध्ये ज्या नवीन चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे त्यात अभिषेक शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग या नावांचा समावेश आहे.
Comments are closed.