आशिया कप 2025 साठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, 17 दमदार खेळाडूंना संधी

आशिया कप 2025 यंदा यूएईच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. या वेळी स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश असेल. आगामी स्पर्धेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आपला स्क्वाड जाहीर केला असून संघाचं नेतृत्व राशिद खान करणार आहे. स्क्वाडमध्ये मोहम्मद नबी आणि अजमतुल्लाह उमरझईसारखे दमदार ऑलराउंडरही आहेत.

अफगाणिस्तानकडून रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झादरान यांनी अलीकडच्या काळात शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या दोघांना ओपनिंगची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. संघात मोहम्मद नबी आणि गुलबदिन नैब यांसारख्या अनुभवी खेळाडूंनाही स्थान देण्यात आलं आहे.

गोलंदाजीत वेगवान माऱ्याची धुरा नवीन-उल-हक सांभाळणार आहे. त्याने अफगाणिस्तानसाठी शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना 2024 मध्ये खेळला होता. त्याच्या नावावर आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 67 बळी नोंदले गेले आहेत. त्याला साथ देण्यासाठी फजलहक फारुकी संघात आहे. फिरकीमध्ये राशिद खान, नूर अहमद आणि अल्लाह गझनफर यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

आशिया कप 2025 साठी अफगाणिस्तान संघ:

रशीद खान (कर्नाधर), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरन, दार्विश रसूली, सीडिकुल्लाह अटल, अजमतुल्लाह उमराजाई, करीम जनत, मोहम्मद नबी, गुलबादिन नायब, शरफुद्दीन नायब, मोहम्मद इश्या अहमद, फरीद मलिक, फरीद मलिक, न्यू-अल्क-हक

राखीव खेळाडू – वफीउल्ला तरखिल, नांगयाल खरोटे, अब्दुल्ला अहमदझाई.

अफगाणिस्तानला आशिया कप 2025 मध्ये पहिला सामना 9 सप्टेंबर रोजी हाँगकाँगविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी बांग्लादेशशी तर 18 सप्टेंबर रोजी श्रीलंकेशी त्यांचा शेवटचा लीग सामना होईल. अफगाणिस्तानचा समावेश ग्रुप-बी मध्ये आहे.

Comments are closed.