ACC कडून मोठी घोषणा! ज्याच्यामुळे भारत-पाकिस्तान राडा झाला, तोच सुपर-4 सामन्यात असणार रेफरी

Andy Pycroft IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असताना, रविवारच्या आशिया कप सुपर-4 सामन्यात टीम इंडिया पुन्हा पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारत-पाकिस्तानच्या सामन्यांत खेळाडूंमध्ये तणाव कायम जाणवतोच, मात्र यावेळी तो आणखी असेल. कारण नुकत्याच झालेल्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता, आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला.

भारत-पाकिस्तान सुपर-4 सामन्यात अँडी पायक्रॉफ्ट असणार मॅच रेफरी! (Andy Pycroft match referee India-Pakistan Super 4)

या सामन्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाने (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एलिट पॅनेलमधील पायक्रॉफ्ट यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. पीसीबीनं दावा केला होता की, पायक्रॉफ्ट यांनीच पाकिस्तानी खेळाडूंना भारतीयांशी हस्तांदोलन करू नका, असं सांगितलं होतं. यावरून त्यांनी अँडी पायक्रॉफ्टवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र आयसीसीने हा प्रस्ताव सरळ फेटाळून लावला. ताज्या घडामोडींनुसार, भारत-पाकिस्तान सामन्यात पायक्रॉफ्टच रेफरीची जबाबदारी सांभाळतील.

पीसीबी पिक्रॉफओव्हर शुल्क (पीसीबी वि अँडी पायक्रॉफ्ट वाद)

पीसीबीनं थेट झिम्बाब्वेच्या अधिकाऱ्यावर आरोप केला होता की, त्यांनी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याला भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत हस्तांदोलन करू नकोस, असा सल्ला दिला.  आयसीसीला लिहिलेल्या पत्रात पीसीबीनं म्हटलं होतं की, “हा गैरवर्तनाचा प्रकार आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2 चं उल्लंघन आहे. खेळभावनेला विरोध करणारा व एमसीसीच्या नियमांचं उल्लंघन करणारा हा प्रकार गुन्हा मानला जावा.”

आयसीसी मात्र आपल्या रेफरीच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. परंतु पीसीबीची नाराजी सामन्यापूर्वीच वातावरण तापवून गेली आहे. पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील करो या मरो सामन्यापूर्वी तणाव शिगेला पोहोचला होता. भारत आधीच पुढील फेरीत पोहोचल्याने उरलेल्या दोन संघांवर हा सामना निर्णायक ठरणार आहे. मैदानाबाहेरील या घडामोडींमुळेच हा सामना विलक्षण वातावरणात खेळला जाणार, यात शंका नाही.

हे ही वाचा –

IND W vs AUS W : निळ्या नाही तर गुलाबी जर्सीत टीम इंडिया! ऑस्ट्रेलियाविरुद्ध BCCI ने का बदलली संघाची जर्सी? मोठे कारण आले समोर

आणखी वाचा

Comments are closed.