Asia Cup 2025 – दुबळ्या हाँगकाँगला नमवत बांगलादेशने खातं उघडलं, लिटन दासची चमकदार खेळी

अबुधाबी शहरातील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेल्या बांगलादेशविरुद्ध हाँगकाँग या सामन्यात बांगलादेशन बाजी मारत स्पर्धेत आपलं खातं उघडलं आहे. नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना हाँगकाँगने 20 षटकांमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात 143 धावा केल्या होत्या. निजाकत खानने 40 चेंडूंमध्ये 42 धावांची खेळी केली. प्रत्त्युत्तरात बांगलादेशने संयमी सुरुवात केली. 24 या धावसंख्येवर बांगलादेशला पहिला हादरा बसला परंतु त्यानंतर लिटन दासने सर्व सूत्र आपल्या हाती घेत 39 चेंडूंमध्ये 59 धावांची वादळी खेळी केली. त्याला तौहित हृदयची (नाबाद 35) साथ मिळाली. त्यामुळे बांगलादेशने 17.4 षटकांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.

Comments are closed.