सफार-ए-यूएई-एक-एक वडील मोठे नाहीत किंवा माईया…!
>> संजय खडे
आज, पन्नास वर्षांपूर्वी आशियाई कपडे तोंडावर सुरू होत असताना, मी ओरडत आहे, 'कोणताही बडद नाही, होल थिएट आहे, होल थिट हे एक गाणे आहे
‘अर्थंम् प्रथमम् वंदे’, असं सुसंस्कृत वचन मी वापरू शकत होतो, पण सुसंस्कृताचा असंस्कृताशी संबंध जोडणं योग्य ठरायचं नाही. थोडक्यात, आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा संघ खेळणार आहे हे पक्कं ठाऊक असताना, पाकिस्तानने पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्याची जाण असताना, त्यानंतरच्या युद्धात हिंदुस्थानची ‘सिंदुरी’ फजिती झालेली असतानाही स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास हिंदुस्थान सरकार आणि क्रिकेट बोर्डाने मान्यता द्यावी हे ‘असंस्कृत’ असंच म्हणावं लागेल.
आपल्या पदरी क्षणोक्षणी अवमान, अपमान आला. वारंवार भेकड हल्ले झाले. संपूर्ण जगाने सपशेल नाकारलं. पाकिस्तानसारख्या फल्गु (क्षुद्र) देशाशी आपली बरोबरी केली गेली याउप्पर नालस्ती ती कुठली! मग स्पर्धेत सहभागी होण्याचं कारण काय?
आशिया कप स्पर्धेच्या टीव्ही प्रसारणाचे, प्रायोजकत्वाचे हक्क, मैदानातील, मैदानाबाहेरील जाहिरातींचे हक्क, तिकीटविक्री इत्यादीमुळे आत्मनिर्भर क्रिकेट बोर्डाला तीन-चारशे कोटींची कमाई होते! अर्थात, सर्व कलंकांवर रामबाण इलाज…!
पैसे म्हणजे पैसे, पैसे कसे आहेत,
या पैशाप्रमाणे कोणीही असे नाही…
आकाश चोप्राने म्हटलंय की, स्पर्धेच्या कमाईतून आपलं बोर्ड स्वतःसाठी एक कपर्दिकही ठेवत नाही. सगळे पैसे आशिया क्रिकेट काऊन्सिलला दिले जातात. अन् त्याचा उपयोग निरनिराळ्या देशात क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी होतो. फारच छान. मग अशा निःस्वार्थ कामगिरीची माहिती बोर्ड नामक परोपकारी गंपू का बरं देत नाही? त्यासाठी गंपूच्या कंत्राटात अडकलेल्या समालोचकाची आवश्यकता का अन् कशासाठी?
आणखी एक, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना खेळण्यास हल्लीच नकार दिला होता. युवराज, हरभजन, शिखर, रैना इत्यादी मंडळीचं त्यासाठी कौतुकसुद्धा झालं होतं. मग आता माजी क्रिकेटपटूंचं देशप्रेम परिपूर्ण आहे आणि आजी क्रिकेटपटूंचं नाही किंवा माजी क्रिकेटपटू मूर्ख आहेत अन् आजी नाहीत यापैकी नेमकं काय सिद्ध करण्याचा भक्तांनी, बोर्डाने अन् देशप्रेमी सरकारने घाट घातलाय?
अजून एक, 14 सप्टेंबरला होणारा पाकविरुद्धचा सामना फोकनाड भक्तमंडळी बघणार का? आपण जिंकलो तर नाचणार का? अन् हरलो तर माती खाणार का?
असो, चालायचंच. चालूद्या.
चला, म्हणा, गुणगुणा, ओरडा…
कोणताही देश मोठा किंवा देश नाही
भोक गोष्ट म्हणजे ड्यूटी,
सर्वांचा भाऊ, सर्वात मोठा रुपैया…
Comments are closed.