भारत पाक मॅचपूर्वी आशिया कपच्या पत्रकार परिषदेत पहिली ठिणगी, सूर्या- सलमान आगा काय म्हणाले?
दुबई: आशिया कप (Asia Cup 2025) स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. भारताची (India) पहिली मॅच उद्या संयुक्त अरब अमिरात (UAE) विरुद्ध होणार आहे. तर, भारत आणि पाकिस्तान रविवारी 14 सप्टेंबरला आमने सामने येणार आहेत. भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करतोय. तर, पाकिस्ताननं (Pakistan) या स्पर्धेसाठी नव्या कॅप्टनची निवड केली आहे. पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगा आहे. आशिया कप स्पर्धेतील सर्व कॅप्टची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) एका उत्तरावर सलमान आगानं (Salman Agha) कमेंट केली. यामुळं भारत पाकिस्तान सामन्याच्या संदर्भात उत्सुकता पत्रकार परिषदेपासून पाहायला मिळाली.
Suryakumar Yadav and Salman Agha : सूर्यकुमार यादव आणि सलमान आगा काय म्हणाले?
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे राजकीय संबंध बिघडलेले आहेत. याचा मॅचवर काय परिणाम होईल का असं सूर्यकुमार यादवला विचारण्यात आलं.यावर सूर्यकुमार यादवनं उत्तर देताना म्हटलं टीम इंडिया जेव्हा मैदानात उतरते तेव्हा आक्रमकतेने मैदानात उतरते.
सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा आक्रमकतेसह येतो. तुम्ही आक्रमकतेशिवाय क्रिकेट खेळू शकत नाही. आम्ही उद्या मैदानावर कमबॅक करण्यासंदर्भात उत्साही असल्याचं सूर्यकुमार यादवनं म्हटलं.
पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगानं सूर्यकुमार यादवच्या उत्तरावर कमेंट केली. तो म्हणाला की ज्यांना आक्रमक व्हायचं आहे त्यांचं खूप स्वागत आहे, ही आक्रमकता फक्त मैदानापर्यंत सीमित असावी. आशिया कपसाठी पाकिस्तानच्या टीममध्ये यावेळी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना स्थान मिळालेलं नाही. त्यामुळं सलमान आगासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.
सूर्यकुमार यादवचं कर्णधार म्हणून रेकॉर्ड
रोहित शर्मानं टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमार यादव टीमचा कॅप्टन आहे. रोहितच्या निवृत्तीपूर्वी देखील सूर्यकुमार यादवनं भारताच्या टीमचं नेतृत्व केलेलं आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्त्वात भारतानं 22 मॅचेस पैकी 17 मॅचेस जिंकल्या आहेत. सूर्यकुमारच्या नेतृत्त्वात एकाही टी 20 मालिकेत भारताचा पराभव झालेला नाही. सूर्यकुमार यादव पहिल्यांदा मोठ्या स्पर्धेत टीमचं नेतृत्त्व करत आहे.
आशिया कपसाठी भारताचा संघ (Asia Cup India Squad)
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल (उपकॅप्टन ), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग
आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)
9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना
https://www.youtube.com/watch?v=p6xf2r2trti
आणखी वाचा
Comments are closed.