भारत अन् बांगलादेश यांच्यात होणार अंतिम सामना?; एका सामन्यानं समीकरण ठरलं, नेमकं काय घडलं?


एशिया कप 2025 अंतिम: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) सध्या सुपर-4 चे सामने सुरु आहेत. सुपर-4 च्या लढतीत आज श्रीलंका आणि पाकिस्तान (Pakistan vs Sri Lanka) यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.  तर 24 सप्टेंबर रोजी भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सामना रंगणार आहे. अद्याप कोणताही संघ अधिकृतपणे आशिया चषकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला नाही. मात्र याचदरम्यान, आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यात होईल, असा अंदाज एका इतिहासाच्या आधारावर व्यक्त करण्यात येत आहे. लिटन दासच्या नेतृत्वाखाली बांगलादेश क्रिकेट संघाने सुपर-4 च्या फेरीत श्रीलंकेला हरवले. भारत हा एकमेव संघ आहे, ज्याने स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारतानंतर बांगलादेशचा संघ स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ मानला जातो.

जेव्हा जेव्हा बांगलादेश श्रीलंकेला हरवतो, तेव्हा…- (Sri Lanka vs Bangladesh)

श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर बांगलादेशची अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता वाढली आहे आणि इतिहास देखील हे दर्शवितो. गेल्या 13 वर्षांत जेव्हा-जेव्हा बांगलादेशने आशिया चषकामध्ये श्रीलंकेला पराभूत केले आहे तेव्हा तेव्हा बांगलादेशचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. बांगलादेशने 2012 च्या आशिया चषकात पहिल्यांदा श्रीलंकेला हरवले होते, त्या हंगामात देखील बांगलादेश अंतिम फेरीत पोहचला होता. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या अंतिम सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला होता. त्यानंतर बांगलादेशने 2016 मध्ये पुन्हा श्रीलंकेला हरवले, त्यावेळीही बांगलादेशचा संघ अंतिम फेरीत पोहोचला, परंतु भारताकडून पराभव पत्करावा लागला. 2018 मध्येही असेच घडले, बांगलादेश तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला. यावेळी, भारताने अंतिम फेरीत त्यांना पराभूत केले. आशिया चषकात जेव्हा जेव्हा बांगलादेशने श्रीलंकेला पराभूत केले, तेव्हा तेव्हा बांगलादेशचा संघ अंतिम फेरीत पोहचला.

आशिया चषकाचा 2025 चा अंतिम सामना कधी आणि कुठे खेळला जाईल? (Asia Cup 2025 Final)

सुपर-4 फेरी पूर्ण झाल्यानंतर, आशिया कप 2025 चा अंतिम सामना रविवार, 28 सप्टेंबर रोजी पॉइंट टेबलमधील टॉप दोन संघांमध्ये खेळला जाईल. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रात्री 8 वाजता जेतेपदाचा सामना खेळला जाईल.

संबंधित बातमी:

Haris Rauf Wife Post Ind vs Pak Asia Cup 2025: आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली…

Sahibzada Farhan Gun Celebration Ind vs Pak Asia Cup 2025: गोळीबाराची ॲक्शन करत सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, अचानक…

आणखी वाचा

Comments are closed.