Asia Cup: आशिया कपमध्ये पहिल्यांदाच खेळणारे 5 भारतीय खेळाडू, प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वांचा समावेश?

आशिया कपसाठी (Asia Cup 2025) टीम इंडियाचा 15 सदस्यीय संघ जाहीर झाला आहे. या संघात शुबमन गिल (shubman gill) उपकर्णधार तर सूर्यकुमार यादव कर्णधार (Suryakumar Yadav) असेल. पण इन-फॉर्म असतानाही श्रेयस अय्यरला (Shreyas iyer) वगळल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे. संघात अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि हर्षित राणा यांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र या संघात असे काही खेळाडू आहेत, जे पहिल्यांदाच आशिया कप खेळणार आहेत.

अभिषेक शर्मा- डावखुरा सलामीवीर अभिषेकने (Abhishek Sharma) 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2023 च्या आशिया कपमध्ये तो नव्हता. त्याचा T20 मध्ये स्ट्राईक रेट तब्बल 194 आहे. 17 सामन्यांत त्याने आतापर्यंत 2 शतकं ठोकली आहेत.

वरुण चक्रवर्ती- 2021 मध्ये वरुणने (Varun chakraworthy) T20 वर्ल्ड कप खेळला होता. पण नंतर संघातून बाहेर पडला. 2024 मध्ये पुनरागमन करताच त्याने 12 सामन्यांत 31 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आशिया कपमध्ये तो भारताचा मुख्य व धोकादायक फिरकी गोलंदाज ठरू शकतो.

संजू सॅमसन – 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करूनही संजूला (Sanju Samson) आजवर आशिया कप खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मधूनच संघात येणं-जाणं यामुळे तो स्थिरावू शकला नाही. इंग्लंडविरुद्ध त्याची कामगिरी फिकी राहिली, पण त्याआधी त्याने 5 डावांत 3 शतकं झळकावून निवड समितीचं लक्ष वेधलं होतं.

रिंकू सिंग- भारताचा फिनिशर म्हणून ओळखला जाणारा रिंकू सिंगची (Rinku Singh) आशिया कपसाठी निवड होईल असं फारसं वाटत नव्हतं. पण त्याला संधी मिळाली. त्यानंतर लगेचच यूपी T20 लीगमध्ये त्याने 48 चेंडूत 108 धावा ठोकून आपली तयारी पक्की असल्याचं दाखवून दिलं.

जितेश शर्मा- RCB कडून IPL 2025 मध्ये केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे जितेश (Jitesh Sharma) आशिया कप संघात पोहोचला. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला जागा मिळेल का नाही, हे अजून ठरलेलं नाही. कारण संघात शुबमन गिल (Shubman gill) असल्याने बॅलन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.