Asia Cup 2025: सलामीसाठी 4 जण रेसमध्ये, कोण ठरणार टीम इंडियाचा सलामीवीर?
2025 आशिया कप टी-20 फॉर्मॅटमध्ये खेळला जाणार आहे. एसीसी म्हणजेच आशियाई क्रिकेट परिषदेनं या स्पर्धेचं वेळापत्रक आणि स्थळ जाहीर केलं आहे. यावेळी आशिया कप यूएईमध्ये होणार आहे. स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होईल, तर अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळवला जाईल. सध्या बीसीसीआयने या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. मात्र, बोर्डासाठी संघाची निवड करणे सोपं जाणार नाही. येथे जाणून घ्या, 2025 आशिया कपमध्ये भारतासाठी ओपनिंग कोण करू शकतो.
सांगायचं झालं तर आशिया कपमध्ये ओपनिंगसाठी पाच दावेदार आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादव, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांना 15 सदस्यीय संघ
दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल 2025 मध्ये केएल राहुलने अनेक स्थानांवर फलंदाजी केली, पण ओपनिंग करताना त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. तो यूएईच्या पिचवर दमदार खेळ करू शकतो. अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेत केएल राहुलने 500 हून अधिक धावा केल्या. त्यानंतर टी-20 संघात त्याच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे.
यशस्वी जयस्वाल जरी टेस्ट सामन्यांमध्ये भारतासाठी लांबलचक खेळी करत असला, तरी तो टी-20चा स्पेशालिस्ट फलंदाज आहे. आयपीएल 2025 मध्येही जयस्वालने अनेक वेळा जलद गतीने धावा करून ते सिद्ध केले होते. जयस्वाललाही आशिया कपमध्ये संधी मिळणार असल्याच्या बातम्या आहेत.
संजू सॅमसन बराच काळ टी-20 मध्ये टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करत आहे. या काळात त्याच्या बॅटमधून तीन शतकंही आली आहेत. सॅमसन अगदी रोहित शर्माच्या शैलीत फलंदाजी करतो. अशा परिस्थितीत त्याला बाहेर करण्याचा निर्णय संघाला महागात पडू शकतो.
अभिषेक शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील क्रमांक-1 फलंदाज आहे. तो वादळी वेगाने धावा करण्यासाठी ओळखला जातो. या फॉर्मॅटचा अभिषेक म्हणजे ‘किंग’ आहे. अभिषेक भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन शतक ठोकले आहेत.
Comments are closed.