हिंदुस्थानी क्रिकेटपटू बीसीसीआयचे कंत्राटी कामगार, प्रियांक खरगे यांचा हल्ला

आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्धचा सामना संपला असला तरी सरकार आणि हिंदुस्थानी संघावर हल्ले सुरूच आहेत. हिंदुस्थानी क्रिकेटपटू बीसीसीआयचे कंत्राटी कामगार असल्यासारखे काल खेळले, अशा शब्दांत कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी निशाणा साधला.

क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीवर देशभक्त क्रिकेटप्रेमींनी बहिष्कार घातला होता. देशभरातून प्रचंड विरोध असतानाही पैशांपुढे झुकलेल्या मोदी सरकारने या लढतीला रान मोकळे करून दिले. या सामन्याबाबत हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या मनात इतका राग भरला होता की, हा ब्लॉकबस्टर सामना रिकाम्या खुर्च्यांच्या साक्षीने झाला आणि ही लढत फ्लॉपबस्टर ठरली. या सामन्याबद्दल प्रियांक खरगे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा सामना खेळवणे ही अतिशय लज्जास्पद बाब असल्याचे सांगितले. बीसीसीआयने देशभक्तीपेक्षा नफा निवडला. सरकारनेसुद्धा त्याला पाठबळ दिले. जर हिंदुस्थानी संघाच्या कर्णधाराने खेळण्यास नकार दिला असता, तर अवघ्या हिंदुस्थानने त्याचे स्वागत केले असते, पण दुर्दैवाने ‘टीम इंडिया’ हे बीसीसीआयचे कंत्राटी कामगार असल्यासारखे वागत आहेत, असे खरगे म्हणाले.

हस्तांदोलन करण्याचा दर्शवा कुणासाठी

पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा दिखावा आपल्या क्रिकेटपटूंनी केला. नक्की ही नाटके संघाने कुणासाठी केली? ते कुणाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत? जर हिंदुस्थानी कर्णधाराने सामना खेळण्यास नकार दर्शवला असता तर मी त्याचे मनापासून कौतुक केले असते, असे खरगे म्हणाले.

Comments are closed.