Asia Cup: भारत- यूएई सामन्यानंतर पॉइंट्स टेबलवर कोणता संघ कोणत्या स्थानावर? जाणून घ्या सविस्तर!

आशिया कप 2025 (Asia Cup) मध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी मधील दोन्ही गटांचे पहिले सामने पार पडले आहेत. ग्रुप ए च्या पहिल्या सामन्यात भारताने युनायटेड अरब एमिरेट्स (UAE) ला पराभूत केले, तर ग्रुप बी च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकॉंग (चीन) ला हरवले. यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये भारत आणि अफगाणिस्तानला सुरुवातीची आघाडी मिळाली आहे. आशिया कप 2025 मध्ये एकूण 8 संघांनी सहभाग घेतला आहे.

गट अ: भारत, युएई, पाकिस्तान, ओमान
ग्रुप बी: अफगाणिस्तान, हाँगकॉंग (चीन), बांगलादेश, श्रीलंका

सध्या आशिया कपसाठी फक्त दोन पॉइंट्स टेबल तयार आहेत.
ग्रुप ए: भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने यूएई विरुद्ध सामना जिंकून 2 पॉइंट्स मिळवले आहेत. या विजयासोबतच टीम इंडियाचा नेट रन रेट (NRR) +10.483 झाला आहे. यूएईला या सामन्यात 9 विकेट्सने पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्यांचा NRR -10.483 आहे. पाकिस्तान आणि ओमानने अजून कोणताही सामना खेळलेला नाही, त्यामुळे ते सध्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघामधील सामना 12 सप्टेंबर रोजी होणार आहे, ज्यामुळे ग्रुप ए च्या टेबलमध्ये बदल दिसू शकतात.

गट ए पॉइंट टेबल

भारत – 1 सामना (जिंकला) – 2 पॉइंट्स

यूएई – 1 सामना (हरला) – 0 पॉइंट्स

ओमान – 0 समोर – 0 गुण

पाकिस्तान – 0 समोर – 0 गुण

ग्रुप बी: ग्रुप बी मध्येही एक सामना झाला आहे. आशिया कपचा पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकॉंग (चीन) यांच्यात पार पडला, ज्यात अफगाणिस्तानने जिंकून 2 पॉइंट्स मिळवले. आशिया कपचा तिसरा सामना आज, 11 सप्टेंबर रोजी, बांगलादेश आणि हाँगकॉंग यांच्यात होत आहे.

गट बी पॉइंट्स टेबल:

अफगाणिस्तान – 1 सामना (जिंकला) – 2 पॉइंट्स

हाँगकॉंग (चीन) – 1 सामना (हरला) – 0 पॉइंट्स

बांगलादेश – 0 सामने – 0 पॉइंट्स

श्रीलंका – 0 सामने – 0 पॉइंट्स

Comments are closed.