शुभमन गिल सलामीला उतरणार, संजू सॅमसनला स्थान मिळणं कठीण, सूर्याचा नंबर तिसरा की चौथा, कशी असेल
बीसीसीआयने एशिया चषक 2025 साठी टीम इंडिया पथकाची घोषणा केली: आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा 15 जणांचा संघ जाहीर झाला आहे. पण या 15 जणांपैकी प्लेइंग इलेव्हन कोण असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शुभमन गिलला संघात समाविष्ट करून उपकर्णधारपदही देण्यात आलं आहे. त्यामुळे आता भारताच्या ओपनिंग जोडीमध्ये बदल होणार का, हा मोठा प्रश्न आहे. कारण उपकर्णधार असलेला गिल नक्कीच खेळेल, पण त्याच्या बदल्यात मग कोणाला बाहेर बसावं लागेल?
अभिषेक शर्मा अन् शुभमन गिल सलामीला उतरणार, संजूला बसावं लागणार बेंचवर?
जर शुभमन गिल सलामी करण्यासाठी आला, तर संजू सॅमसनची प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होईल जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. चीफ सिलेक्टर अजीत आगरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट संकेत दिले की, “सॅमसन संघात होता, कारण गिल उपलब्ध नव्हता.” म्हणजे आता गिल परत आल्यामुळे सॅमसनला बेंचवर बसावं लागेल.
भारताचा संभाव्य मिडल ऑर्डर
सलामीनंतर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा दिसेल. तर चौथ्या स्थानी कर्णधार सूर्यकुमार यादव मैदानात उतरेल अशी शक्यता आहे. पाचव्या क्रमांकावर विकेटकीपर जितेश शर्मा किंवा संजू सॅमसन खेळेल. आयपीएलमध्ये आरसीबीकडून शानदार कामगिरी केल्यानंतर जितेशला संधी देण्यात आली आहे, पण तो खेळणार नाही. पाचव्या क्रमांकावर संजू सॅमसनला खेळू शकतो.
2 ऑलराउंडर + 2 फिरकीपटू + 2 मुख्य वेगवान गोलंदाज
सहाव्या स्थानी हार्दिक पांड्या फलंदाजीसोबतच गोलंदाजीची जबाबदारीही पार पाडेल. यासोबत दुसरा ऑलराउंडर म्हणून शिवम दुबे सातव्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि तो येथे फिनिशरची भूमिका खेळेल. रिंकू सिंगला बॅकअप म्हणून निवडल्यामुळे त्याला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संधी मिळणं अवघड आहे. फिरकीपटू म्हणून संघात अक्षर पटेल आणि कुलदीप यादवला संधी मिळू शकते. तर मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग खेळणार निश्चित आहे. म्हणजेच भारत 2 ऑलराउंडर, 2 फिरकीपटू आणि 2 वेगवान माऱ्यांसह मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.
आशिया कपसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आानी अर्शदीप सिंग.
आशिया कप 2025 साठी भारतीय संघ
- फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
- अष्टपाई: हार्दिक पांड्या, शिवम दुबे, क्षरा पटेल.
- यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.
- गोलांडज: जसप्रीत बुमराह, वरुना चक्रवर्ती, अर्शदिप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.