भारत अन् पाकिस्तानचे खेळाडू आले आमने-सामने; दुबईत सराव सुरु असताना पुढे काय घडलं?
एशिया कप 2025 भारत विरुद्ध पाकिस्तान: आशिया चषकाची स्पर्धा (Asia Cup 2025) आजपासून (9 सप्टेंबर) सुरु खेळवण्यात येत आहे. आज आशिया चषकातील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग (AFG vs Hongkong) यांच्यात खेळवला जाणार आहे. तर भारताचा पहिला सामना यूएईविरुद्ध (Ind vs UAE) 10 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. तसेच आशिया चषकमधील भारत आणि पाकिस्तानचा (Ind vs Pak) हायव्होल्टेज सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.
भारत आणि पाकिस्तानचा संघ सध्या यूएईमध्ये पोहचले असून दोन्ही संघांचा कसून सराव सुरु आहे. दुबईतील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ सराव करत आहे. सरावादरम्यान, भारत आणि पाकिस्तानचे संघ समोरासमोर आले. मात्र दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये कोणताही संवाद झाला नाही. दोन्ही संघांनी आपापला सराव पूर्ण केला आणि न बोलता मैदानातून परतले.
पूर्ण स्विंगमध्ये प्रीप्स 💪
𝙈𝙖𝙩𝙘𝙝 𝘿𝙖𝙮 ची काउंटडाउन सुरू होते ⏳#Teamindia | #Asiacup2025 pic.twitter.com/3sc57xilxd
– बीसीसीआय (@बीसीसीआय) 7 सप्टेंबर, 2025
भारतीय संघाची जोरदार तयारी-
दुबईतील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये भारतीय संघाचे दुसरे सराव सत्र झाले. संघाचे हे सत्र तीन तासांहून अधिक काळ चालले. वृत्तानुसार, सर्व फलंदाजांनी सुमारे एक तास फलंदाजीचा सराव केला. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघाच्या तयारीवर बारकाईने लक्ष ठेवले. संघाचे प्रशिक्षक एड्रियन ले रॉक्स यांनी खेळाडूंना फिटनेस ड्रिल करायला लावले.
पाकिस्ताननेही एका खास खेळपट्टीवर केला सराव-
दुसरीकडे, पाकिस्तान संघाने चांगली तयारी केली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या संघाने एका खास खेळपट्टीवर सराव केला. चेंडू जास्त स्विंग होत होता, अशा खेळपट्टीवर पाकिस्तानच्या खेळाडूंनी सराव केला.
भारत-पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्यावर लक्ष-
आजपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. अबुधाबीमध्ये हाँगकाँग आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू होईल. टीम इंडिया 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध पहिला सामना खेळेल. तथापि, सर्वांचे लक्ष 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही संघांमधील ही पहिलीच लढत असेल, त्यामुळे या हाय-व्होल्टेज सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा संघ – (Team India Squad For Asia Cup 2025)
फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
अष्टपाई: हार्दिक पांड्या, शिवम दुबे, क्षरा पटेल.
यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.
गोलांडज: जसप्रीत बुमराह, वरुना चक्रवर्ती, अर्शदिप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.
आशिया कप 2025 चे संपूर्ण वेळापत्रक- (ग्रुप स्टेज)- (Asia Cup 2025 Full Schedule, Match Dates, Venues)
9 सप्टेंबर (मंगळवार) : अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध युएई
11 सप्टेंबर (गुरुवार) : बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर (शुक्रवार) : पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर (शनिवार) : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर (सोमवार) : श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर (मंगळवार) : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर (बुधवार) : पाकिस्तान विरुद्ध युएई
18 सप्टेंबर (गुरुवार) : श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध ओमान
सुपर 4 सामन्यांचे वेळापत्रक-
20 सप्टेंबर (शनिवार) : ग्रुप बी क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 2
21 सप्टेंबर (रविवार) : ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप ए क्वालिफायर 2
23 सप्टेंबर (मंगळवार) : ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 2
24 सप्टेंबर (बुधवार) : गट ब पात्रता 1 विरुद्ध गट अ पात्रता 2
25 सप्टेंबर (गुरुवार) : गट अ पात्रता 2 विरुद्ध गट ब पात्रता 2
26 सप्टेंबर (शुक्रवार) : गट अ पात्रता 1 विरुद्ध गट ब पात्रता 1
28 सप्टेंबर (रविवार) : अंतिम सामना
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
Anil Kumble मोठी बातमी : BCCI गुगली टाकणार, भारताचा महान फिरकीपटू अध्यक्षपदी बसवणार?
आणखी वाचा
Comments are closed.