चाहत्यांना धक्का!! आशिया कपच्या पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंगला डिच्चू!

ASIA CUP 2025: टीम इंडियाच्या आशिया कपच्या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियासमोर युएईचं आव्हान आहे. या सामन्यात टीम इंडियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र या सामन्यासोबत एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.

मागील काही दिवसांत अर्शदीप सिंगने टी20 क्रिकेट अविश्वसनीय कामगिरी केली आहे, शिवाय तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. पण टीम मॅनेजमेंटने हा निर्णय कोणत्या निकषावर घेतला आहे, ते समजण्यापलीकडे आहे.

या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. सामन्यापूर्वी त्याच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या सामन्यात अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे तीन फिरकीपटू खेळत आहेत.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन-

शुबमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.

मुहम्मद वसीम (कर्नाधर), अलिशन शराफू, मुहम्मद जोहाब, राहुल चोप्रा, आसिफ खान, हरशीत कौशिक, हैद अली, ध्रुव परशर, मुहम्मद रोहित खान, जुनैद सिद्दीकी, सिमरंजित

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.