आशिया कप 2025: कुलदीप-दुबेची जादू, युएई फक्त 57 धावांत गारद! टीम इंडियासमोर 58 धावांचं माफक लक्ष्य
आशिया कप 2025 ला भारताने जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने युएईवर जोरदार हल्ला चढवत त्यांचा संपूर्ण संघ केवळ 57 धावांत गारद केला. दुबई येथे खेळल्या जात असेल्या या सामन्यात भारताने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो अचूक ठरला. आता टीम इंडिया समोर 58 धावांचं माफक लक्ष्य आहे.
भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच युएईच्या फलंदाजांवर दबाव टाकला. युएईचा एकही फलंदाज 25+ धावा करू शकला नाही. संघाचा डाव केवळ 13.1 षटकांत संपुष्टात आला. युएईकडून अलिशान शारफूने सर्वाधिक 22 धावा केल्या. तर गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादवने कहर केला. त्याने केवळ 7 धावांत 4 बळी घेतले. फिरकीसमोर युएईचे फलंदाज हतबल झाले. दुसरीकडे बाजूला शिवम दुबेने फक्त 4 धावांत बाद 3 गडी करत भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. तसेच अक्षर पटेल,वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतले.
विशेष म्हणजे, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्शदीप सिंगला स्थान न मिळाल्याने अनेकांना धक्का बसला होता. पण त्याची कमतरता सामन्यात भासली नाही, भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत युएईला केवळ 57 धावांवर रोखले आहे. आता टीम इंडिया किती षटकात हे लक्ष्य पार करते हे पाहणे योग्य राहिल.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन-
शुबमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.हार्दिक पंड्या जर्सी
मुहम्मद वसीम (कर्नाधर), अलिशन शराफू, मुहम्मद जोहाब, राहुल चोप्रा, आसिफ खान, हरशीत कौशिक, हैद अली, ध्रुव परशर, मुहम्मद रोहित खान, जुईद सिद्दीकी, सिमरंजित
Comments are closed.