‘त्या’ पाकिस्तानीच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी नको, टीम इंडियाची भूमिका, भारताच्या विजयानंतर दुबईत


आयएनडी वि पीएके अंतिम आशिया कप 2025: आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांची सुरुवात वादाने झाली होती आणि त्याचा शेवटही वाद झाला. ग्रुप स्टेजमध्ये भारत–पाकिस्तानच्या पहिल्या सामन्यात हस्तांदोलन न केल्यामुळे सुरुवात झालेला वाद, अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या विजयाच्या नंतर प्रेझेंटेशन सेरेमनीत झालेल्या ड्रामापर्यंत पोहोचला.

दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमांचक लढतीत पाकिस्तानला 5 गडी राखून हरवले. मात्र दुबईत मध्यरात्री ट्रॉफी उचलण्यासाठी टीम इंडियाला बराच वेळ थांबावे लागले आणि याचे कारण ठरले पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्वी. टीम इंडियाने नक्की यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ पोस्ट करून टीम इंडियाचे अभिनंदन केले.  (Indian team refuses to collect trophy medals from PCB chief Mohsin Naqvi)

‘त्या’ पाकिस्तानीच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी नको, टीम इंडियाची भूमिका

तिलक वर्माच्या अफलातून आणि अविस्मरणीय अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानला 5 विकेटने हरवत विक्रमी 9व्यांदा आशिया कपचे जेतेपद पटकावले. तिलक वर्माने 53 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या, ज्यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. भारताने विजय मिळवताच दुबईतील ‘रिंग ऑफ फायर’ स्टेडियम फटाक्यांच्या रोषणाईने उजळून निघाले. दुसरीकडे, पाकिस्तानचे खेळाडू डोकं खाली घालून शांतपणे ड्रेसिंगरूमकडे परतले. टीम इंडियाने पाकिस्तान सरकारचे मंत्री आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

भारताच्या विजयानंतर दुबईत मध्यरात्री मोठा ड्रामा! प्रेझेंटेशन सेरेमनी 1 तास 16 मिनिटे उशिरा, पण…

अंतिम सामना संपून बराच वेळ झाला होता, पण प्रेझेंटेशन सेरेमनीदरम्यान पाकिस्तान संघाने लाजिरवाणं कृत्य केलं. सगळे लोक मैदानावर सज्ज उभे होते, मात्र पाकिस्तानचा संघ तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ खाली आला नाही, ज्यामुळे प्रेझेंटेशन सेरेमनी तब्बल 1 तास 16 मिनिटे उशिरा पार पडला. पण टीम विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघाने ट्रॉफी उचलली नाही. खरं तर, संघाने एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे पुरस्कार सोहळा संघाला ट्रॉफी न घेताच संपला. असे वृत्त होते की संघाला एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांकडून ट्रॉफी मिळेल, परंतु संघाने न घेण्याचा निर्णय घेतला.

नरेंद्र मोदी यांनी केले टीम इंडियाचे अभिनंदन

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ पोस्ट करून टीम इंडियाचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले की, “खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल तोच – विजय. आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा.”

आणखी वाचा

Comments are closed.