फक्त 30 धावा आणि अभिषेक शर्मा मोडणार रोहित–रिझवानचा वर्ल्ड रेकॉर्ड!
अभिषेक शर्मा टी20 आशिया कप 2025 मध्ये आपल्या जबरदस्त कामगिरीमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या बॅटमधून सतत धावा होत आहेत. तो टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर ठरत आहे. चालू स्पर्धेत त्याने धावांची आतषबाजी केली असून आशिया कपच्या एका एडिशनमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्याने नवा इतिहास रचला आहे. आता पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात अभिषेककडे आणखी मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
अभिषेकने स्पर्धेतील पहिला सामना यूएईविरुद्ध खेळला. ज्यात त्याने 30 धावा केल्या. त्यानंतर मात्र त्याची धडाकेबाज फॉर्म कायम राहिला. सुपर-4 टप्प्यात पाकिस्तानविरुद्ध 74, बांग्लादेशविरुद्ध 75 आणि श्रीलंकेविरुद्ध 61 अशी प्रभावी अर्धशतकी खेळी त्याने केली. आतापर्यंत 6 सामन्यांत अभिषेकने एकूण 309 धावा केल्या आहेत आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी तो सर्वात मोठा डोकेदुखी ठरत आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक 30+ धावा करण्याचा विक्रम रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवान यांच्या नावावर आहे. या दोघांनी 7-7 वेळा सलग 30 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मानेही मागील 7 डावांमध्ये सलग 30+ धावा केल्या आहेत.
आता अंतिम सामन्यात जर त्याने आणखी 30 धावा केल्या, तर तो सलग 8 वेळा 30+ धावा करणारा पहिला खेळाडू ठरेल आणि रोहित-रिझवानचा विक्रम मोडीत काढेल.
अभिषेक शर्माचे मागील 7 डाव
इंग्लंड – 135
युएई – 30
पाकिस्तान – 31
ओमान -38
पाकिस्तान – 74
बांगलादेश – 75
श्रीलंका – 61
अभिषेकने आशिया कपमध्ये भारताला प्रत्येक सामन्यात दमदार सुरुवात करून दिली आहे. त्याच्या जोरदार फलंदाजीमुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला असून पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो आणखी एक मोठी खेळी करेल, अशी सर्व भारतीय चाहत्यांची अपेक्षा आहे.
Comments are closed.