जिओस्टारवर नाही तर या ठिकाणी पहा आशिया कप 2025 चे थेट सामने… एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Asia Cup 2025: आशिया कप क्रिकेटचा 17 वा पर्व आजपासून (9 सप्टेंबर) संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये रंगणार आहे. यंदा ही स्पर्धा टी20 स्वरूपात खेळवली जाणार असून एकूण आठ संघ त्यात सहभागी होत आहेत. भारताकडे यजमानपद असले तरी ही स्पर्धा युएईच्या धर्तीवर खेळवली जात आहे.

गट ए – भारत, पाकिस्तान, युएई, ओमान
ग्रुप बी – श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग

स्पर्धेचा पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होईल. मात्र, सर्वांची नजर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे असेल. भारत आपल्या मोहिमेची सुरुवात बुधवारपासून यूएईविरुद्ध करेल, तर 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानची रोमांचक टक्कर रंगणार आहे. अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.

भारतामध्ये कुठे पाहाल थेट प्रक्षेपण?
आशिया कपचे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. तर थेट प्रक्षेपणासाठी SonyLiv अ‍ॅप आणि वेबसाइट उपलब्ध असेल.

आशिया कपसाठी भारताचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्नाधर), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्राबोर्टी, आर्शदीप सिंह, रिंज सिंदव.

भारताचा रेकॉर्ड तुफान, प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठं आव्हान!
आशिया कपमध्ये भारताचा इतिहास नेहमीच दमदार राहिला आहे. या वेळीही टीम इंडियाचा तोल जड दिसत असून प्रतिस्पर्ध्यांसमोर त्यांना हरवणं ही सर्वात मोठी कसोटी ठरणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी भारतीय संघाने कोणताही सराव सामना खेळला नसला तरी संघाने आयसीसीच्या सेंटरमध्ये कसून सराव केला आहे. ज्यामध्ये संघातील सर्व खेळाडू शानदार फाॅर्ममध्ये दिसत होते.

Comments are closed.