Asia Cup 2025: भारताचा कोणत्या संघांशी सामना कधी होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
टीम इंडिया (Team india) सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये (Asia Cup 2025) सहभागी होणार आहे. हा स्पर्धा टी-20 (T-20) फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. एकूण 8 संघ यात सहभागी होतील. स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होईल आणि अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळवला जाईल. मागील आशिया कप भारताने जिंकला होता, त्यामुळे यंदाही चाहत्यांना विजयाचीच अपेक्षा आहे. भारतीय संघाची निवड लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
आशिया कपमध्ये भारताकडे सर्वांचे लक्ष या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर 2025 रोजी यूएई विरुद्ध होईल. तर 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. तरी या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Comments are closed.