पाकिस्तानने श्रीलंकेचा केला पराभव; आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत अन् पाकिस्तान भिडणार?


एशिया कप 2025 पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका: आशिया चषक 2025 मधील (Asia Cup 2025) सुपर-4 फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा (Pakistan vs Sri Lanka) 5 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. तर सुपर-4 च्या फेरीत सलग दुसरा पराभव पत्करल्याने स्पर्धेतील श्रीलंकेचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. दरम्यान, आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर काल (23 सप्टेंबर) खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 134 धावांचे लक्ष्य (Pakistan vs Sri Lanka) ठेवले होते. हुसेन तलतच्या नाबाद 32 आणि मोहम्मद नवाजच्या नाबाद 38 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 18 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 138 धावा करत 5 विकेट्सने विजय मिळवला.

हुसेन तलत आणि मोहम्मद नवाजने पाकिस्तानला मिळवून दिला विजय- (Pakistan Win Over Sri Lanka)

पाकिस्तानने पहिल्या विकेटसाठी साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी 45 धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली. फरहान बाद झाल्यानंतर, लागोपाठ विकेट्स पडू लागल्या. पाकिस्तान संघाने 80 धावांत 5 विकेट्स गमावल्या. त्यानंतर हुसेन तलत आणि मोहम्मद नवाज यांनी नाबाद 58 धावांची भागीदारी करून पाकिस्तानला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला.

पाकिस्तान अन् श्रीलंकेचा सामना कसा राहिला? (Pakistan and Sri Lanka)

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर निसांका आणि कुसल मेंडिस अनुक्रमे 8 आणि 0 धावांवर शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कुसल परेराने 12 चेंडूत 15 धावा काढल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कर्णधार चरिथ असलंकाने 19 चेंडूत 20 धावा केल्या. तर शनाकाला खातंही उघडता आले नाही. श्रीलंकेकडून हसरंगाने 15 धावा केल्या. कामिंदू मेंडिस आणि चमिका करुणारत्ने यांनी सातव्या विकेटसाठी 43 धावा जोडल्या. कामिंदू मेंडिस आणि चमिका करुणारत्ने यांनी सातव्या विकेटसाठी 43 धावा जोडल्या आणि संघाची धावसंख्या 123 पर्यंत पोहोचवली. कामिंदू मेंडिसने अर्धशतक झळकावले, 44 चेंडूत 50 धावा काढल्या, ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. चमिका करुणारत्नेने 17 धावा केल्या. मेंडिसच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेला 20 षटकांत 8 बाद 133 धावांपर्यंत मजल मारता आली.

पाकिस्तानची गोलंदाजी कशी झाली? (हेन आफ्री डायसेस्ट डब्ल्यूकेट्स

शाहीन आफ्रिदीने 4 षटकांत 28 धावा देत 3 विकेट्स पटकावल्या. तर हुसेन तलतने 3 षटकांत 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. हारिस रौफने 4 षटकांत 37 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आणि अबरार अहमदने 4 षटकांत फक्त 8 धावा देत 1 विकेट्स पटकावली.

संबंधित बातमी:

Haris Rauf Wife Post Ind vs Pak Asia Cup 2025: आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली…

Abhishek Sharma Ind vs Pak Asia Cup 2025: साहिबजादा फरहानचं गोळीबार करत सेलिब्रेशन; अभिषेक शर्मानेही ‘L’ दाखवले, आता स्वत:ने अर्थही सांगितला!

आणखी वाचा

Comments are closed.