आशिया कपसाठी संघ जाहीर करताच पाकिस्तानने भारताला डिवचले, म्हणाला, ‘आमचे 17 खेळाडू पुरेसे…’

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025: आशिया कप 2025 चा थरार 9 सप्टेंबरपासून दुबईत रंगणार असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या 17 जणांच्या संघाची घोषणा (Pakistan Announce Squad For Asia Cup 2025) केली आहे. हा संघ मुख्य प्रशिक्षक माईक हेसन आणि निवड समितीचे सदस्य व माजी पाकिस्तानी खेळाडू आकिब जावेद यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. यावेळी आकिब जावेद यांनी भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठे विधान केले.

आमच्या संघात कोणालाही हरवण्याची क्षमता – आकिब जावेद

आकिब जावेद यांना विचारले गेले की, निवडलेल्या या संघात 14 सप्टेंबरला होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात जिंकण्याची ताकद आहे का? त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ‘भारत-पाकिस्तान सामना हा जगातील सर्वात मोठा क्रिकेट सामना आहे. त्यात खेळणारे खेळाडू तसेच आजूबाजूचे प्रत्येकजण या सामन्याचे महत्त्व जाणून आहेत. आशिया कप 2025 साठी ज्या 17 खेळाडूंची निवड झाली आहे, त्यांच्यात स्पर्धेतील कुठल्याही संघाला हरवण्याची क्षमता आहे.”

पाकिस्तानकडे भारताला हरवण्याची ताकद…

जावेद पुढे म्हणाले की, “या संघात भारताला हरवण्याची क्षमता आहे. भारत-पाकिस्तान सामना हा केवळ एक क्रिकेट सामना नसून तो जगातील सर्वात मोठा सामना आहे. हे प्रत्येक खेळाडू आणि संबंधित व्यक्तींना ठाऊक आहे. या 17 खेळाडूंमध्ये कुठल्याही संघाला हरवण्याची ताकद आहे. त्यांच्यावर अनावश्यक दडपण टाकण्याची गरज नाही. आजच्या परिस्थितीत मी खूप आशावादी आहे.”

भारताचा पाकिस्तानवर दबदबा

भारताचा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी असा विक्रम आहे. आतापर्यंत झालेल्या 13 सामन्यांपैकी भारताने तब्बल 10 सामने जिंकले आहेत. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा पाकिस्तान 120 धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला होता आणि सहा धावांनी पराभूत झाला होता.
भारत हा आशिया कपचा विद्यमान विजेता आहे. 2023 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात करत विजेतेपद जिंकले होते.

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ – (Pakistan Squad For Asia Cup 2025)

सलमान अली आघा (कर्नाधर), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमण, हॅरिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तालत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (यशक्रक्स), मोहमद नवाझ, मोहमद, मोहमद, मोहमद, मोहमद, मोहमद, मोहमद, मोहमद, मोहमद, मोहमाद शाहीन शाह, शाहीन शाह, आनही सूफियस.

हे ही वाचा –

Shaheen Afridi Fact Check : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीवर लाहोरमध्ये झाडल्या 7 गोळ्या? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं काय आहे सत्य

आणखी वाचा

Comments are closed.