पाकिस्तानचा बांगलादेशवर विजय, आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान फायनलमध्ये
एशिया कप 2025 दुबई: आशिया कपमधील 17 वा सामना सुपर फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात पार पडला. दुबईतील स्टेडियममध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये बांगलादेशनं टॉस जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 8 बाद 135 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघानं 9 बाद 124 इतक्या धावा केल्या. आता आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल. भारतानं पाकिस्तान आणि बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. पाकिस्ताननं 11 धावांनी बांगलादेशवर विजय मिळवला.
Pakistan vs Bangladesh : पाकिस्तानचा विजय, अंतिम फेरीत भारताबरोबर लढत
पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट घेत 135 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून मोहम्मद हॅरिस यानं सर्वाधिक 31 धावा केल्या. बांगलादेशच्या तस्कीन अहमदनं तीन विकेट घेतल्यानं पाकिस्तानचा संघ 135 धावांपर्यंत पोहोचू शकला.
पाकिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी करताना चांगली सुरुवात करता आली नाही. साहिबजादा फरहान 4 धावा करुन बाद झाला. तर, फखर जमान 20 बॉलमध्ये 13 धावा करुन बाद झाला. हुसैन तलत यानं 7 बॉलमध्ये 3 धावा केल्या. पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगा 23 बॉलमध्ये 19 धावा करुन बाद झाला. शाहीन आफ्रिदीनं 19 आणि मोहम्मद हॅरिसनं 31 धावा केल्या. नवाजनं 15 बॉलमध्ये 25 धावा केल्या. फहीम यानं 9 बॉलमध्ये 14 धावा केल्या. हॅरिस 3 रन करुन बाद झाला.
136 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का बसला. इमॉन एकही धाव करु शकला नाही. शाहीन आफ्रिदीनं पहिली विकेट घेतली. तौहीदनं 10 बॉलमध्ये 5 धावा केल्या. हॅरिस राऊफनं सैफ हसनला बाद केलं. त्यानं 15 बॉलमध्ये 18 धावा केल्या. मेहदी हसन यानं 10 बॉलमध्ये 11 धावा केल्या. नुरुल हसन यानं 21 बॉलमध्ये 16 धावा केल्या. बांगलादेशनं 20 ओव्हरमध्ये 9 बाद 124 धावा केल्या.
आशिया कपच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान आमने सामने
आशिया कप फायनलमध्ये भारतानं अगोदरच धडक दिलेली आहे. भारतानं सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बांगलादेशला पराभूत केल्यानं पाकिस्तानकडे सुपर फोरमध्ये 4 गुण झाल्यानं त्यांनी देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा सुपर फोरमधील एक सामना बाकी असून तो श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. आशिया कपची अंतिम फेरीची लढत 28 सप्टेंबरला होणार आहे. भारतानं पाकिस्तानला यंदाच्या आशिया कपमध्ये पाकिस्तानला दोनवेळा पराभूत केलं आहे. ग्रुप स्टेजमध्ये आणि सुपर फोरमध्ये भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं. आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा आमने सामने येत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.