Asia Cup 2025: पाकिस्तानची श्रीलंकेवर 5 विकेट्सने दणदणीत मात, आता फायनलमध्ये भारताशी थेट भिडंत?
आशिया कप सुपर 4 च्या एका महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा 5 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 134 धावांचे लक्ष्य ठेवले. हुसेन तलतच्या नाबाद 32 आणि मोहम्मद नवाजच्या नाबाद 38 धावांच्या खेळीमुळे पाकिस्तानने 18 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 1 38 धावा करत 5 विकेट्सने विजय मिळवला.
पाकिस्तानने पहिल्या विकेटसाठी साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांच्या 45 धावांच्या भागीदारीतून चांगली सुरुवात केली. फरहान बाद झाल्यानंतर लागोपाठ विकेट्स पडू लागल्या. 80 धावांत संघाने 5 विकेट्स गमावल्या. त्यानंतर हुसेन तलत आणि मोहम्मद नवाज यांनी नाबाद 58 धावांची भागीदारी करून पाकिस्तानला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला.
या विजयासह, आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या पाकिस्तानच्या आशा जिवंत राहिल्या आहेत, तर श्रीलंकेच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धचा त्यांचा मागील सामना गमावला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर निस्सांका आणि कुसल मेंडिस यांना शाहीन आफ्रिदीने अनुक्रमे 8 आणि 0 धावांवर बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कुसल परेराला हरिस रौफने 15 धावांवर बाद केले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कर्णधार चारिथ असलंका 19 चेंडूत 20 धावांवर बाद झाला. माजी कर्णधार शनाका 0 धावांवर बाद झाला. हसरंगा 15 धावांवर बाद झाला.
कामिन्दु मेंडिस आणि चमिका करुणारत्ने यांनी सातव्या विकेटसाठी 43 धावा जोडून संघाचा धावसंख्या 123 पर्यंत नेली. कामिन्दु मेंडिसने अर्धशतक झळकावले, 44 चेंडूत 50 धावा केल्या. चमिका करुणारत्नेने 17 धावा केल्या. मेंडिसच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेने 20 षटकांत 8 बाद 133 धावा केल्या.
शाहीन आफ्रिदीने 4 षटकांत 28 धावा देत 3 बळी घेतले. हुसेन तलतने 3 षटकांत 18 धावा देत 2 तर हरिस रौफने 4 षटकांत 37 धावा देत 2 बळी घेतले आणि अबरार अहमदने 4 षटकांत फक्त 8 धावा देत 1 बळी घेतला.
Comments are closed.