Asia Cup 2025 – सूर्यकुमार यादवला फाईन लावा, मॅच रेफरीवर कारवाई करा…; पाकिस्तानच्या मागण्यांना ICC ची केराची टोपली

आशिया चषकातील 10 वा सामना सध्या जोरदार चर्चेत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आडमुठेपणामुळे सामना सुरू होण्यास वेळ लागला आहे. हिंदुस्थानने पहिल्या सामन्यात पाकिस्तानची नांगी ठेचल्यामुळे त्यांचा तिळपापड झाल्याच दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी UAE विरुद्ध खेळण्यास नकार देत ICC कडे दोन मागण्या केल्या होत्या. तसेच मागण्या मान्य न केल्यास सामना न खेळण्याचा इशारा दिला होता. मात्र, ICC ने त्यांना केराची टोपली दाखवत तोंडावर पाडलं आहे.
पाकिस्तानने केलेल्या दोन मागण्यांमध्ये मॅच रेफरी एंडी पाइक्रॉफ्ट यांना हटवण्याची मुख्य मागणी केली होती. हिंदुस्थान-पाकिस्तान सामना संपल्यानतंर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्याचे टाळले होते. त्यामुळे आमच्या खेळाडूंना अपमान सहन करावा लागला, असा आरोप PCB ने केला आहे. या घटनेला एंडी पाइक्रॉफ्ट जबाबदार असल्याचं, PCB चं म्हणन आहे. परंतु ICC ने या गोष्टींना स्पष्ट नकार दिला आहे. त्याचबरोबर PCB ने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. सूर्यकुमार यादवने सामना संपल्यानंतर राजकीय वक्तव्य केल्याचा आरोप PCB ने केला आहे. त्यामुळे त्याच्यावर फाईन लावण्याची मागणी PCB ने केली होती. परंतु ICC ने कोणतीही कारवाई केली नाही.
Comments are closed.