भारताच्या फिल्डिंगला हसणाऱ्या पाकिस्तानचे दात घशात, बांगलादेश विरुद्धचा व्हिडीओ पाहून छी थू!


पाक वि बांगलादेश व्हिडिओ: पाकिस्तानने बांग्लादेश संघाचा अवघ्या 11 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण क्रिकेट जगतात चर्चा सुरु आहे ती म्हणजे पाकिस्तानच्या फिल्डिंगची  (Pak Vs Bangladesh VIDEO). दोन्ही फलंदाज एक टोकाला असून देखील पाकिस्तानच्या संघाला रनआऊट करता न आल्याने सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवण्यात येत आहे. त्यांच्या फिल्डींगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. (Pak Vs Bangladesh VIDEO)

Pakistan vs Bangladesh : पाकिस्तानची खराब दर्जाची फिल्डिंग

नाणेफेकीत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानने  १३५ धावा केल्या आहेत. हे आव्हान बांग्लादेश सहज पुर्ण करून फायनलमध्ये पोहोचू शकली असती. धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशची सुरूवात खराब झाली होती. एका मागून एक विकेट गमावत बांग्लादेश जिंकणारी मॅच हारली. पण यादरम्यान पाकिस्तानची खराब दर्जाची फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
पाकिस्तानने दिलेल्या १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने सावध सुरूवात केली. पण शाहीन आफ्रिदीच्या भेदक गोलंदाजीवर बांगलादेशच्या मोठ्या फलंदाजांनी पॉवरप्लेमध्येच विकेट गमावले. पण पाचव्या षटकात पाकिस्तानच्या सर्वात खराब फिल्डिंगचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.  ज्याचा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Pakistan vs Bangladesh : मैदानात नेमकं काय घडलं?

पाचव्या षटकात शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजीला आला. तौहिद ह्रदय आणि सैफ फलंदाजी करत होते. तौहिद स्ट्राईकवर होता आणि त्याने बॅकवर्ड डीपकडे चेंडू टोलवला. सईम अयूब तिथे फिल्डिंग करत होता आणि त्याने कमालीचा डाईव्ह करत चेंडू अडवला. पण तोपर्यंत याबाजूने सैफ स्ट्राईकर एन्डच्या दिशेला पोहोचला होता. ज्यामुळे सैफ धावबाद होणार हे निश्चित होतं.

सॅम अयुबने ताबडतोब चेंडू पकडला आणि गोलंदाजाच्या टोकाकडे फेकला. पण थ्रो पकडण्यासाठी तिथे कोणीच नव्हते.  दरम्यान, सैफ पुन्हा क्रीजकडे धावला आणि दुसऱ्या पाकिस्तानी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि फेकला. पण चेंडू मात्र स्टंपपर्यंत पोहोचला नाही. तिथे तीन जण चेंडू टिपण्यासाठी पोहोचले होते. पण क्षेत्ररक्षकाकडून चेंडूचं पोहोचला नाही. सैफने जर थेट थ्रो मारला असता तर तो बाद झाला असता, पण तसे काहीच घडले नाही.

Pakistan vs Bangladesh : आम्हाला पाकिस्तानकडून हीच अपेक्षा

पाकिस्तानची ही खराब फील्डिंग पाहून समालोचक इरफान पठाण यांनी आम्हाला पाकिस्तानकडून हीच अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने मोठी संधी गमावली.

Pakistan vs Bangladesh : पाकिस्तानचा विजय, अंतिम फेरीत भारताबरोबर लढत

पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट घेत 135 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून मोहम्मद हॅरिस यानं सर्वाधिक 31 धावा केल्या. बांगलादेशच्या तस्कीन अहमदनं तीन विकेट घेतल्यानं पाकिस्तानचा संघ 135 धावांपर्यंत पोहोचू शकला. पाकिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी करताना चांगली सुरुवात करता आली नाही. साहिबजादा फरहान 4 धावा करुन बाद झाला. तर, फखर जमान 20 बॉलमध्ये 13 धावा करुन बाद झाला. हुसैन तलत यानं 7 बॉलमध्ये 3 धावा केल्या. पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगा 23 बॉलमध्ये 19 धावा करुन बाद झाला. शाहीन आफ्रिदीनं 19 आणि मोहम्मद हॅरिसनं 31 धावा केल्या. नवाजनं 15 बॉलमध्ये 25 धावा केल्या. फहीम यानं 9 बॉलमध्ये 14 धावा केल्या. हॅरिस 3 रन करुन बाद झाला.

136 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का बसला. इमॉन एकही धाव करु शकला नाही. शाहीन आफ्रिदीनं पहिली विकेट घेतली. तौहीदनं 10 बॉलमध्ये 5 धावा केल्या. हॅरिस राऊफनं सैफ हसनला बाद केलं. त्यानं 15 बॉलमध्ये 18 धावा केल्या. मेहदी हसन यानं 10 बॉलमध्ये 11 धावा केल्या. नुरुल हसन यानं 21 बॉलमध्ये 16 धावा केल्या. बांगलादेशनं 20 ओव्हरमध्ये 9 बाद 124 धावा केल्या.

Pakistan vs Bangladesh : आशिया कपच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान आमने सामने

आशिया कप फायनलमध्ये भारतानं अगोदरच धडक दिलेली आहे. भारतानं सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बांगलादेशला पराभूत केल्यानं पाकिस्तानकडे सुपर फोरमध्ये 4 गुण झाल्यानं त्यांनी देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा सुपर फोरमधील एक सामना बाकी असून तो श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. आशिया कपची अंतिम फेरीची लढत 28 सप्टेंबरला होणार आहे. भारतानं पाकिस्तानला यंदाच्या आशिया कपमध्ये पाकिस्तानला दोनवेळा पराभूत केलं आहे. ग्रुप स्टेजमध्ये आणि सुपर फोरमध्ये भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं. आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा आमने सामने येत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.