Asia Cup: ओमान विरुद्ध जसप्रीत बुमराहला विश्रांती! प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार ‘या’ गोलंदाजाची एंट्री?
सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघ आधीच सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. टीम इंडिया 19 सप्टेंबरला ओमानविरुद्ध (IND vs OMAN) लीग स्टेजचा शेवटचा सामना खेळेल आणि या सामन्यात भारतीय टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार आहेत.
न्यूज एजन्सी पीटीआयच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघ व्यवस्थापनाने या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत हा स्पर्धेतील प्रमुख दावेदार आहे आणि त्यांना अजून चार सामने खेळायचे आहेत. संघ व्यवस्थापनाला माहित आहे की, त्यांच्या प्रमुख वेगवान गोलंदाजाला पुढील आव्हानासाठी ताजेतवाने ठेवणे महत्त्वाचे आहे.
बुमराहने स्वतः या सामन्यासाठी विश्रांतीची इच्छा व्यक्त केली का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण व्यवस्थापनाचा हा निर्णय व्यावहारिक वाटतो, कारण ते स्पर्धा संपेपर्यंत त्याला जोखमीत घालू इच्छित नाहीत. जर बुमराहला विश्रांती दिली गेली, तर हर्षित राणा (Harshit Rana) किंवा अर्शदीपपैकी (Arshdeep singh) कोणीतरी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकतो. अर्शदीप खेळण्याची जास्त शक्यता आहे, कारण भारताने आधीच्या दोन्ही सामन्यात फक्त एकच वेगवान गोलंदाज ठेवला होता.
संयुक्त अरब अमीरात आणि पाकिस्तानविरुद्ध भारताचे पहिले दोन सामने एकतर्फी राहिले. ओमानविरुद्ध भारत आधी फलंदाजी करेल की नाही, हे देखील मनोरंजक ठरणार आहे, कारण मिडल ऑर्डर आणि खालच्या क्रमातील फलंदाजांना अद्याप सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. भारताला सुपर-4 मध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध सामना करावा लागू शकतो, त्यामुळे व्यवस्थापनाला हवे आहे की, सर्व फलंदाजांना कमीत कमी एकदा तरी फलंदाजीची संधी मिळावी.
Comments are closed.