आशिया कपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ, आज सुपर 4 मधील दुसरा संघ निश्चित होणार

एशिया कप 2025 गुण सारणी सुपर 4 स्पर्धा: आशिया कप 2025 आता एक रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये सतत उलथापालथ होत आहे. भारताने सुपर-4 मध्ये आपली जागा पक्की केली आहे, तर आज बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यानंतर सुपर-4 मधील दुसऱ्या संघाचे नाव निश्चित होऊ शकते. ग्रुप ए मध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे, तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका आघाडीवर आहे. पण आजचा सामना जिंकला तर अफगाणिस्तान टेबल टॉपर होऊ शकतो.

बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये सुपर-4 साठी रस्सीखेच


बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये मंगळवार, 16 सप्टेंबर रोजी सामना रंगणार आहे. अफगाणिस्तानने आतापर्यंत एकच सामना खेळला असून त्यात विजय मिळवला आहे. जर आज अफगाणिस्तान बांगलादेशला हरवतो, तर तो सुपर-4 मध्ये प्रवेश निश्चित करेल. बांगलादेशसाठी हा लीग स्टेजमधील शेवटचा सामना आहे. जर त्यांना सुपर-4 मध्ये पोहोचायचं असेल, तर अफगाणिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. कारण बांगलादेशचा नेट रन रेट (NRR) -0.650 आहे, तर अफगाणिस्तानचा NRR +4.700 आहे.

अफगाणिस्तान बनेल का टेबल टॉपर?

ग्रुप बी मध्ये सध्या श्रीलंका आघाडीवर आहे. त्यांनी आतापर्यंत दोन सामने खेळून दोन्ही जिंकले आहेत आणि 4 गुण मिळवले आहेत. पण त्यांचा NRR +1.546 आहे, जो अफगाणिस्तानपेक्षा कमी आहे. त्यामुळे जर अफगाणिस्तान आज जिंकला, तर तो ग्रुप बी मध्ये टॉपवर पोहोचेल आणि सुपर-4 मध्ये जाणारा दुसरा संघ बनेल. ग्रुप ए मधून फक्त भारताने सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. भारताने लीग स्टेजमध्ये 3 पैकी 2 सामने खेळले असून, दोन्हींत विजय मिळवला आहे. भारताचा NRR +4.793 आहे. आता भारताचा पुढचा सामना ओमानसोबत होणार आहे.


इतर महत्त्त्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.