1 संघ सुपर-4 मध्ये, 2 संघ बाहेर; 5 संघांमध्ये रस्सीखेच; आशिया चषकात काय घडतंय?, पाहा Points Tab

एशिया कप 2025 गुण सारणी: आशिया चषक 2025 ची स्पर्धा (Asia Cup 2025) सध्या रोमांचक वळणार पोहचली आहे. आशिया चषकातून एकूण 8 संघापैकी 2 संघ स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. तर भारत सुपर-4 मध्ये दाखल झाला आहे. सध्या 5 संघांमध्ये गुणतालिकेत रस्सीखेच सुरु आहे.

आशिया कप 2025 च्या स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबर रोजी अबुधाबी येथे अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने झाली. यंदा आशिया चषकाची स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, ओमान, यूएई आणि हाँगकाँग असे एकूण आठ संघ आहेत. आशिया चषकाच्या स्पर्धेत या आठ संघांमधून सध्या भारत हा एकमेव संघ सुपर-4 मध्ये पोहचला आहे.

ग्रुप-अ चं समीकरण काय?

ग्रुप-अ मध्ये, भारताने आधीच दुहेरी विजयासह सुपर-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांनी युएई आणि पाकिस्तानला हरवले आहे. आता शुक्रवारी ओमान विरुद्ध भारताचा सामना फक्त औपचारिकता असेल कारण ओमान आधीच बाहेर पडला आहे. आज पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील सामना दुसऱ्या स्थानासाठी लढत होईल. पाकिस्तान आणि यूएईच्या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो संघ ग्रुप-अ मधील सुपर-4 मध्ये स्थान निश्चित करेल.

ग्रुप-ब चं समीकरण काय?

श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश सध्या आशिया चषकाच्या ग्रुप-ब मध्ये दोन पात्रता स्थानांसाठी लढत आहेत, तर हाँगकाँग तीन पराभवांनंतर आधीच बाहेर पडला आहे. तसेच अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचा सामना 18 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो संघ ग्रुप-ब मधील सुपर-4 मध्ये स्थान निश्चित करेल.

पाहा आशिया चषक 2025 स्पर्धेचे Points Table: (16 सप्टेंबरपर्यंतचे)

आशिया कपमधील उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक-

17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना-

20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Ind vs Pak Asia Cup 2025: फायनल जिंकूनही ट्रॉफी घेणार नाही…; हस्तांदोलन टाळल्यानंतर सूर्यकुमार यादवने आता कोणती डिमांड ठेवली?

Pak vs UAE Asia Cup 2025: दोन दिवसांआधी उर्वरित आशिया चषकातून माघार घेण्याची धमकी; पाकिस्तान आज यूएईविरुद्ध सामना खेळणार?, महत्वाचे अपडेट्स

आणखी वाचा

Comments are closed.