पाकिस्तानचा धमाकेदार विजय, ओमानला 93 धावांनी हरवले! पण पॉइंट्स टेबलवर टीम इंडियाच नंबर-1

एशिया कप 2025 गुण सारणी: आशिया कप 2025 च्या चौथ्या सामन्यात पाकिस्तानने ओमानवर 93 धावांनी पहिला दणदणीत विजय नोंदवला. 12 सप्टेंबर शुक्रवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा डाव 20 षटकांत फक्त 160 धावा केल्या. त्यानंतर विजयासाठी लागलेल्या 161 धावांचा पाठलाग करताना ओमानची संपूर्ण संघ अवघ्या 67 धावांवर आटोपला.

तरीही पाकिस्तान ‘नंबर वन’ नाही (Pakistan beat Oman Asia Cup 2025 Points Table)

या विजयामुळे पाकिस्तान ग्रुप-ए च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेपावला असला तरी पहिल्या स्थानी मात्र अजूनही भारतच विराजमान आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट या विजयामुळे 4.65 वर पोहोचला आहे, पण भारताचा दबदबा कायम आहे.

पॉइंट्स टेबलवार टीम इंडियाश क्रमांक -1 (आशिया कप 2025 गुण टेबल गट)

भारताने 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध जोरदार विजय मिळवला होता. टीम इंडियाने आधी यूएईला फक्त 57 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांच्या तुफानी खेळीमुळे 58 धावांचा टार्गेट अवघ्या 4.3 षटकांत 1 विकेट गमावून पूर्ण केला. या विजयामुळे भारताचा नेट रनरेट तब्बल 10.483 इतका झाला आहे, जो इतर सर्व संघांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्यामुळे पाकिस्तान जिंकूनही भारताच्या वर पोहोचू शकला नाही.

आशिया कप 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये ग्रुप-बीची काय आहे स्थिती? (Asia Cup 2025 Points Table Group B)

ग्रुप-बी मध्ये अफगाणिस्तानने 9 सप्टेंबरला हाँगकाँगवर विजय मिळवत पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यांचा नेट रनरेट 4.700 इतका आहे. दुसऱ्या स्थानी बांग्लादेश आहे, ज्याने 11 सप्टेंबरला हाँगकाँगचा 7 गडी राखून पराभव केला होता. या विजयामुळे त्यांचा नेट रनरेट 1.001 इतका झाला आहे. श्रीलंका अजूनपर्यंत एकही सामना खेळलेली नाही, त्यामुळे ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दोन सामने हरणाऱ्या हाँगकाँगला चौकटीत शेवटचं स्थान मिळालं आहे.

हाँगकाँग जवळपास बाहेरच

सलग दोन सामने गमावल्यानंतर हाँगकाँगची सुपर-फोर फेरीत जाण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. त्यांचा पुढचा सामना 15 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. हा सामना त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता उरला आहे, कारण सुपर-फोरमध्ये जाण्यासाठी त्यांना प्रचंड मोठा विजय मिळवावा लागेल आणि इतर संघांचे निकालही त्यांच्या बाजूने लागणे आवश्यक आहे, जे सध्या अशक्य आहे.

हे ही वाचा –

BCCI President Election : बीसीसीआयचा अध्यक्ष कोण होणार? हरभजन सिंगचं नाव चर्चेत, सौरव गांगुलीही शर्यतीत, 28 तारखेला निवडणूक

आणखी वाचा

Comments are closed.