आशिया कप 2025चं वेळापत्रक बदललं! टीम इंडिया आता कधी खेळणार हे जाणून घ्या

अलीकडेच हॉकी पुरुष आशिया कप 2025 ची ट्रॉफी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजगीर येथे अनावरण केली. या स्पर्धेतून पाकिस्तान संघाने माघार घेतली आहे. त्यामुळे आता सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. आशिया कप 2025 चे नवे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. बिहारमधील राजगीर येथे होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान पार पडणार आहे.

पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर त्यांची जागा बांग्लादेशच्या हॉकी संघाने घेतली आहे. या स्पर्धेत 8 संघांना 2 गटांमध्ये विभागण्यात आले आहे. यात पूल-ए मध्ये भारत, जपान, चीन आणि कझाकिस्तान या संघांचा समावेश आहे. तर पूल-बी मध्ये मलेशिया, कोरिया, बांग्लादेश आणि चायनीज तायपेई हे संघ आहेत. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा पहिला सामना 29 ऑगस्ट रोजी चीनविरुद्ध होणार आहे. 29 ऑगस्टला एकूण 4 सामने खेळले जातील. गट-पातळीवरील सामन्यानंतर 4 संघ सुपर-4 फेरीत प्रवेश करतील, जिथे पॉइंट्स टेबलवरील अव्वल 2 संघांमध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे.

Comments are closed.