भारत-पाक पुन्हा आमने-सामने; ठिकाण ठरलं, पण वेळापत्रक अजून गुलदस्त्यात, जाणून घ्या कधी होणार घोष

एशिया चषक 2025 वेळापत्रकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना: क्रिकेटप्रेमींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2025 च्या आशिया कपच्या आयोजनावरचे सर्व अडथळे जवळपास दूर झाले आहेत. बीसीसीआयने या प्रतिष्ठित स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले असून, ही स्पर्धा दुबईत आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

भारत-पाकिस्तान महामुकाबला 14 सप्टेंबरला?

क्रिकबझच्या अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांना एकाच गटात ठेवले जाणार असल्याने हा सामना टाळता येणार नाही. आणि म्हणूनच या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहणार आहे.

आशिया कप 2025 चे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता

स्पर्धा 10 ते 28 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार असल्याचे सूचक संकेत मिळाले आहेत. यामध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार असून, एकूण 19 सामने खेळवले जातील. अंतिम सामना 19 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. सर्व सामने दुबई आणि अबू धाबी येथे होणार असल्याचे बोलले जात आहे.

ACC बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

ACC (आशियाई क्रिकेट परिषद) च्या वार्षिक बैठकीनंतर बीसीसीआयने या स्पर्धेच्या यजमानीसाठी होकार दिला आहे. या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता आणि सर्व मुद्द्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यात आला.

बीसीसीआयकडून लवकरच अधिकृत घोषणा

सध्या बीसीसीआय वेळापत्रकावर अंतिम चर्चा करत आहे आणि त्यात थोडेफार बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील 24 ते 48 तासांत पूर्ण वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले जाऊ शकते. 2025 चा आशिया कप आता जवळ आला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबरला रंगण्याची शक्यता आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष या स्पर्धेकडे लागले असून लवकरच याचे संपूर्ण वेळापत्रक समोर येणार आहे.

हे ही वाचा –

Jasprit Bumrah News : फलंदाज ज्याला बघून घाबरतात, तो बुमराह कसोटी क्रिकेटमधून घेणार निवृत्ती? समोर आले मोठे कारण, व्हिडिओ

आणखी वाचा

Comments are closed.