आशिया चषकाच्या सुपर-4 मधील संघ ठरले; कोणता संघ कधी अन् कोणासोबत भिडणार?, A टू Z माहिती

एशिया कप 2025, सुपर 4 वेळापत्रकः आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) सुपर-4 चे समीकरण आता स्पष्ट झाले आहे. ग्रुप अ मधून भारत आणि पाकिस्तान आणि ग्रुप ब मधून श्रीलंका आणि बांगलादेश सुपर-4 च्या फेरीत दाखल झाले आहेत. क्रिकेट चाहत्यांना आता पुढील काही दिवसांत हाय-व्होल्टेज सामने पाहायला मिळतील, जिथे प्रत्येक संघ अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्न करेल.

भारताने प्रभावी कामगिरीने सलग विजयांसह अव्वल स्थान मिळवून सुपर-4 मध्ये प्रवेश निश्चित केला. तर पाकिस्तानने यूएईला हरवून ग्रुप अ मधून आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे, श्रीलंकेने अफगाणिस्तानवर विजय मिळवल्यानंतर अपराजित राहून ग्रुप ब मधून बांगलादेशसह सुपर फोरमध्ये आपले स्थान निश्चित केले.

सुपर-4 चे संपूर्ण वेळापत्रक- (Asia Cup 2025 Super 4 Schedule)

सुपर-4 चे सामने 20 सप्टेंबरपासून सुरू होतील. पहिला सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात अबुधाबी येथे खेळवला जाईल. सुपर-4 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.

21 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई

23 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, अबुधाबी

24 सप्टेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई

25 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, दुबई

26 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई

अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा सामना कसा राहिला?

आशिया कप 2025 मध्ये अफगाणिस्तानच्या अनुभवी फलंदाज मोहम्मद नबीने श्रीलंकेविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी खेळत धुमाकूळ घातला. नबीने केवळ 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 60 धावा ठोकल्या. यावेळी त्याने दुनिथ वेल्लालागेच्या एका षटकात सलग 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केला. 71 धावांवर 5 गडी बाद झाल्यानंतर नबी मैदानात उतरला. त्याने राशिद खान (24) सोबत सातव्या विकेटसाठी 35 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. 18 षटकांनंतर अफगाणिस्तानचा स्कोर 120/7 होता, तेव्हा नबी 10 चेंडूत 14 धावांवर खेळत होता. यानंतर त्याने 19व्या षटकात चमीराच्या गोलंदाजीवर 19 धावा काढल्या आणि अखेरच्या षटकात वेल्लालागेला पाच षटकार मारले. 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 18.4 षटकांत 4 गडी गमावून विजय मिळवला. यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने श्रीलंकेकडून शानदार अर्धशतक झळकावले आणि विजय मिळवला. त्याने 52 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 74 धावा केल्या. कुसल परेराने 20 चेंडूत 3 चौकारांसह 28 धावा केल्या. कामिंदू मेंडिसने 13 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 26 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान, अझमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी, मोहम्मद नबीच्या शानदार खेळीमुळे अफगाणिस्तान 169 धावा करू शकला.

संबंधित बातमी:

SL vs AFG Asia Cup 2025: अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरु असताना श्रीलंकेच्या खेळाडूच्या वडिलांचं निधन; त्याच्याच षटकात नबीने टोलावले 5 षटकार

आणखी वाचा

Comments are closed.