ठरलं.! आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा ‘या’ दिवशी, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

आशिया कप 2025 साठी भारतीय संघाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आगामी स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा 19 आणि 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या दोन दिवसांत निवड समितीची बैठक घेऊन अंतिम संघ जाहीर करणार आहे. बीसीसीआय सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या टी20 संघरचनेत मोठे बदल होण्याची शक्यता नाही. या संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश कायम राहण्याची शक्यता आहे. निवडकर्ते या मुख्य गटावरच भर देण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, कसोटी सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांचा आशिया कप संघात समावेश होण्याची शक्यता कमी आहे. जयस्वाल आणि साई सुदर्शनसाठी जागा मिळवणे अवघड ठरणार आहे, तर केएल राहुललाही टी20 मधल्या फळीत फलंदाजी करत नसल्यामुळे संधी मिळण्याची शक्यता नाही.

संभाव्य भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा/प्रसिद्ध कृष्णा, जितेश शर्मा/ध्रुव जुरेल.

बातमी अपडेट होत आहे..

Comments are closed.