पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूचा मोठा निर्णय; टीम इंडियाची सोडली साथ, कारण काय?
एशिया चषक 2025 टीम इंडिया: आशिया चषक स्पर्धेची सुरुवात झाली असून भारताचा पहिला सामना यूएईविरुद्ध झाला. या सामन्यात भारतीय संघाने 9 विकेट्सने युएईचा पराभव केला. आता भारताचा पुढील सामना पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे. 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) अचानक टीम इंडियाची साथ सोडत इंग्लंडला रवाना झाला आहे.
आशिया चषकाच्या स्पर्धेत वॉशिंग्टन सुंदरचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरने काउंटी चॅम्पियनशिप खेळण्याचा निर्णय घेतला आहे. वॉशिंग्टन सुंदरला इंग्लिश काउंटी टीम हॅम्पशायरकडून खेळण्याची ऑफर मिळाली. ही ऑफर वॉशिंग्टन सुंदरने स्विकारली.
हॅम्पशायरने काय म्हटले?
हॅम्पशायर क्रिकेट क्लबने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल माहिती देऊन वॉशिंग्टन सुंदरचे स्वागत केले आणि लिहिले, “आम्हाला वॉशिंग्टन सुंदर संघात सामील करण्याबद्दल खात्री होती. स्वागत आहे वॉशी! भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर रोझ आणि क्राउनविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी हॅम्पशायरकडून खेळेल.”
वॉशिंग्टन सुंदर काउन्टी क्रिकेटमध्ये हॅम्पशायरचे प्रतिनिधित्व करेल. pic.twitter.com/r8rsg9fqkj
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 11 सप्टेंबर, 2025
वॉशिंग्टन सुंदरची इंग्लंड दौऱ्यावर दमदार कामगिरी-
वॉशिंग्टन सुंदरने अलीकडील इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सुंदरने फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी दाखवली. सुंदरने फलंदाजीत 284 धावा केल्या आणि या दरम्यान त्याची सरासरी 47 होती. या मालिकेत सुंदरने ओल्ड ट्रॅफर्ड येथे शानदार शतकही झळकावले. सुंदरने गोलंदाजीतही उत्तम कामगिरी केली. सुंदरने 38.57 च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या होत्या.
आशिया कप 2025 चे संपूर्ण वेळापत्रक- (ग्रुप स्टेज)- (Asia Cup 2025 Full Schedule, Match Dates, Venues)
9 सप्टेंबर (मंगळवार) : अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध युएई
11 सप्टेंबर (गुरुवार) : बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर (शुक्रवार) : पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर (शनिवार) : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर (सोमवार) : श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर (मंगळवार) : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर (बुधवार) : पाकिस्तान विरुद्ध युएई
18 सप्टेंबर (गुरुवार) : श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध ओमान
सुपर 4 सामन्यांचे वेळापत्रक-
20 सप्टेंबर (शनिवार) : ग्रुप बी क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 2
21 सप्टेंबर (रविवार) : ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप ए क्वालिफायर 2
23 सप्टेंबर (मंगळवार) : ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 2
24 सप्टेंबर (बुधवार) : गट ब पात्रता 1 विरुद्ध गट अ पात्रता 2
25 सप्टेंबर (गुरुवार) : गट अ पात्रता 2 विरुद्ध गट ब पात्रता 2
26 सप्टेंबर (शुक्रवार) : गट अ पात्रता 1 विरुद्ध गट ब पात्रता 1
28 सप्टेंबर (रविवार) : अंतिम सामना
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या,VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.