टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतून घेणार माघार; BCCI चा निर्णय जवळपास निश्चित, लवकरच घोषणा

एशिया कप 2025: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan War) यांच्यात सध्या तणाव सुरु आहे. याचदरम्यान, बीसीसीआय (BCCI) एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी आशिया चषकातून टीम इंडिया (Indian Cricket Team) माघार घेणार असल्याचं समोर आलं आहे. एका वृत्तानूसार टीम इंडिया आगामी आशिया चषक (Asia Cup 2025) खेळणार नाही. याबाबत बीसीसीआयकडून लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 2025 मध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे.

बीसीसीआयच्या निर्णयानुसार, टीम इंडिया आगामी आशिया कपमध्ये सहभागी होणार नाही. पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग आशिया कपवरही बीसीसीआय बहिष्कार टाकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बीसीसीआयने याबाबत आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) देखील या निर्णयाची माहितीही दिली आहे. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे अध्यक्ष सध्या पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी आहेत, जे पीसीबीचे अध्यक्ष देखील आहेत.

बीसीसीआयच्या निर्णयामुळे आशिया चषक स्पर्धा धोक्यात-

बीसीसीआयच्या निर्णयामुळे सप्टेंबरमध्ये खेळवण्यात येणारी आशिया चषक स्पर्धा धोक्यात आली आहे. भारताव्यतिरिक्त, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ आशिया कपमध्ये खेळतात. आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामन्याकडे जगभराचं लक्ष लागलेलं असतं.

आशिया चषक ही आशियातील प्रमुख क्रिकेट स्पर्धा आहे, जी 1984 पासून आयोजित केली जाते. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इतर आशियाई संघ सहभागी होतात. स्पर्धा एकदिवसीय आणि ट्वेंटी- 20 या दोन्ही स्वरूपात खेळवली जाते. भारत हा आशिया चषकातील सर्वाधिक यशस्वी संघ आहे, भारताने एकूण 8 वेळा विजेतेपद पटकावले आहे. श्रीलंका 6 वेळा आणि पाकिस्तान 2 वेळा विजेतेपद मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

आशिया चषक विजेते (1984 ते 2023)




















वर्ष विजेता आणीबाणी यजमान देश फॉर्म
१९८४ भारत श्रीलंका संयुक्त अरब अमिराती एकदिवसीय
१९८६ श्रीलंका पाकिस्तान श्रीलंका एकदिवसीय
१९८८ भारत श्रीलंका बांगलादेश एकदिवसीय
१९९० – ९१ भारत श्रीलंका भारत एकदिवसीय
१९९५ भारत श्रीलंका संयुक्त अरब अमिराती एकदिवसीय
१९९७ श्रीलंका भारत श्रीलंका एकदिवसीय
२००० पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश एकदिवसीय
२००४ श्रीलंका भारत श्रीलंका एकदिवसीय
२००८ श्रीलंका भारत पाकिस्तान एकदिवसीय
२०१० भारत श्रीलंका श्रीलंका एकदिवसीय
२०१२ पाकिस्तान बांगलादेश बांगलादेश एकदिवसीय
२०१४ श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश एकदिवसीय
२०१६ भारत बांगलादेश बांगलादेश टी 20 आय
२०१८ भारत बांगलादेश संयुक्त अरब अमिराती एकदिवसीय
२०२२ श्रीलंका पाकिस्तान श्रीलंका टी 20 आय
२०२३ भारत श्रीलंका श्रीलंका/पाकिस्तान एकदिवसीय

संबंधित बातमी:

IPL 2025 Points Table : सुदर्शन-गिलच्या वादळात दिल्ली गेली वाहून; गुजरात, आरसीबी अन् पंजाबची थाटात प्लेऑफमध्ये एंट्री; चौथ्या स्थानासाठी रंगणार शर्यत

अधिक पाहा..

Comments are closed.