Asia Cup 2025 – हिंदुस्थान सुपर-4मध्ये

यूएईने ओमानचा 42 धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. या विजयामुळे यूएईने केवळ आपले खातेच उघडले नाही, तर सुपर-4मध्ये पोहोचण्याच्या आशाही जिवंत ठेवल्या आहेत. दुसरीकडे सलग दोन पराभवांनंतर ओमान स्पर्धेतून बाद झाला आहे. या पराभवामुळे हिंदुस्थान अधिकृतरीत्या सुपर-4 फेरीत पोहोचला आहे. हिंदुस्थानने दोन विजयांसह गटात अव्वल स्थान काबीज ठेवले आहे. हिंदुस्थानचा पुढचा सामना 19 सप्टेंबरला ओमानविरुद्ध होणार असला तरी तो औपचारिकता ठरणार आहे, कारण हिंदुस्थान आधीच पुढच्या टप्प्यात पोहोचला आहे.

17 सप्टेंबरच्या पाकिस्तानयुएई सामन्यात ठरणार सुपर फोरचा युनियन

ग्रुप-एमधील आता फक्त एक मोठा सामना बाकी आहे. पाकिस्तान विरुद्ध यूएई हा सामना जिंकणारी टीमच हिंदुस्थानसोबत सुपर-पह्रमध्ये प्रवेश करेल. पाकिस्तान आणि यूएई दोघांच्याही खात्यावर 2-2 गुण असल्याने हा सामना ‘करो या मरो’ स्वरूपाचा ठरणार आहे.

Comments are closed.